creditcard

Breaking: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह फरार घोषित

axis

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि गृहरक्षक दलाचे महासंचालक परमबीर सिंह यांना गोरेगाव खंडणी प्रकरणात फरार घोषित करण्यात आलं आहे. गोरेगाव खंडणी प्रकरणात मुंबईच्या गुन्हे शाखेने न्यायालयाकडे अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने मंजूर केला. ३० दिवसांच्या आत परमबीर सिंह हे हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे.

No posts found.

गोरेगाव खंडणी प्रकरणात परमबीर सिंह यांना गुन्हेगार घोषित करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने काही दिवसांपूर्वी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. विशेष सरकारी वकील शेखर जगताप यांनी मुंबईच्या महानगर दंडाधिकारी न्यायालयात अर्ज दाखल करून परमबीर सिंह व्यतिरिक्त रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना गुन्हेगार घोषित करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

मुंबई गुन्हे शाखेचा अर्ज न्यायालयाने मंजूर करत परमबीर सिंह यांना फरार घोषित केलं. रियाझ भाटी आणि विनय सिंग उर्फ बबलू या इतर दोन आरोपींना देखील फरार घोषित करण्यात आलं आहे. ३० दिवसांच्या आत परमबीर सिंह हे हजर न झाल्यास त्यांची संपत्ती जप्त केली जाणार आहे.

विशेष सरकारी वकील शेखर जगताप म्हणाले, आमच्याकडे आधीच आरोपींविरुद्ध तीन अजामीनपात्र वॉरंट आहेत, त्यामुळे आम्ही आपीला घोषित गुन्हेगार घोषित करण्यासाठी हा अर्ज करत आहोत, असं म्हटलं होतं. याआधीच्या सुनावणी वेळी वकील शेखर जगताप यांनी आमच्याकडे आधीच आरोपींविरुद्ध तीन अजामीनपात्र वॉरंट आहेत, त्यामुळे आम्ही आरोपीला गुन्हेगार घोषित करण्यासाठी हा अर्ज करत आहोत, असं न्यायालयाला सांगितलं होतं. या आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, १२० (ब) आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवलेला आहे.