creditcard

नाशिक: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू

axis

नाशिक: इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू

No posts found.

नाशिक (प्रतिनिधी): लहान मुलं घरात एकटे खेळत असतांना पालकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा निष्काळजीपणा बाळाच्या जीवावर बेतू शकतो. असाच प्रकार नाशिकरोड येथे घडला आहे.

घरात एकटा खेळत असतांना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २३ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची घटना के. जे. मेहता शाळेजवळ घडली आहे. नाशिकरोड परिसरातील के.जे. मेहता शाळेजवळ लोटस अपार्टमेंट आहे. इथे २३ महिन्याचा युवेन प्रतिक मोकशी हा राहत्या घरी एकटा खेळत होता. खेळता खेळता तो तिसर्या मजल्यावरून पडल्याने त्याच्या डोक्यास गंभीर मार बसला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
ह्या बातम्यासुद्धा तुम्ही नक्की वाचा:
नाशिक: विनाहेल्मेट पेट्रोल न दिल्याने पंप कर्मचाऱ्याला मा’र’हा’ण करणाऱ्यांना अनोखी शिक्षा

नाशिक: नळ कनेक्शन लावण्यावरून झालं भांडण; शेजाऱ्याने दगडच डोक्यात मारला..
नाशिक शहरातील या भागात शुक्रवारी (दि. ३ सप्टेंबर) पाणीपुरवठा नाही