‘एकनाथ शिंदे माझे चांगले मित्र’, संजय राऊत अचानक नरमले

मुंबई (प्रतिनिधी): ‘एकनाथ शिंदे हे अजूनही शिवसेनेच्या कार्यकारणीमध्ये आहेत. उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पक्षाचे गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. ते आमचे मित्र आहे, सहकारी आहे. अयोध्येला ते माझ्यासोबत होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबात व्यक्तिगत राग नाही’ असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांवर कारवाई करण्यास 11 जुलैपर्यंत वेळ दिला आहे. पण आता कालपर्यंत एकनाथ शिंदे गटावर टीका करणारे संजय राऊत आता मवाळ झाले आहे.

‘गुवाहाटीमध्ये आमदार बसले आहे. त्या आमदारांना आता 11 जुलैपर्यंत मुक्काम वाढवावा लागेल. त्यांना झाडी, डोंगराचा आनंद घ्यावा लागेल. कोर्टाचा महत्त्वाचा आदेश आहे.  उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आहेत, आम्ही अजूनही त्यांना बंडखोर म्हणायला मानत नाही. त्यातील अनेक जण संपर्कात आहे. त्यांचे कुटुंबीय आमच्याशी संपर्क करत आहे. त्या लोकांना ज्या परिस्थितीत ठेवलं आहे, ती परत येतील असा आम्हाला विश्वास आहे’ असं राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे  हे आता ही येऊ शकतात. एकनाथ शिंदे हे अजूनही कार्यकारणीमध्ये आहे. उद्धव ठाकरे यांनीच त्यांना पक्षाचे गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. ते आमचे मित्र आहे, सहकारी आहे. अयोध्येला ते माझ्यासोबत होते. त्यांच्याविषयी माझ्या मनात अजिबात व्यक्तिगत राग नाही, त्यांची व्यक्तिगत लढाई आहे, त्यांनी महाराष्ट्रात यावे, असंही राऊत म्हणाले.

सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये चलबिचल सुरू झाली आहे. अकोल्यात शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहे. ठिकठिकाणी जनसागर उसळला आहे. लवकरच ठाण्यात सभा घेणार आहोत. अशा विचारांच्या लोकांना शिवसेनेत स्थान नाही. वेट अँड वॉच कुणी करत असेल, तर आम्हीही त्याच भूमिकेत आहे, असंही राऊत म्हणाले.

राज्यपाल यांनी खरंतर 12 आमदारांच्या निर्णय घेतला पाहिजे. त्यांची यादी राजभवनाच्या झाडीझुडपीत पडलेली आहे, ती शोधली पाहिजे. बरं आहे त्यांचा कोरोना बरा झाला आहे, ते कामाला लागले आहे. त्यांनी आता काम करावी, असा टोला राऊत यांनी लगावला.

देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहे. त्यांच्याकडे 106 आमदारांचं बळ आहे. इतका मोठा आमदारांचा गट महाराष्ट्रात कधी निर्माण झाला नाही. हा गट महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो ही आमची कायम भूमिका आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही क्षमता आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहे. पण त्यांनी आता जे डबकं झालं आहे, त्यांनी यात उतरू नये, एक मित्र म्हणून त्यांना सांगणं आहे. ज्या पद्धतीने डबकं तयार केलं आहे, डबक्यात बेडूक राहतात. फडणवीस जर त्यात उतरले तर भाजपची आणि पंतप्रधान मोदींची कमालीची अप्रतिष्ठा होईल, त्यात कुणी उडी मारणार नाही, असा सल्लाही राऊत यांनी फडणवीसांना दिला.

दिपक केसरकर यांनी गुवाहाटीला जाण्याआधी माझा शिवसेनेचा योद्धा म्हणून सत्कार केला होता. बिकेसीला सभा झाली होती, त्यावेळी त्यांनी तुम्ही जी लढाई लढत आहात. मोठी रॅली काढून न्यावे, असं सांगितलं होतं. त्यांनी दोन वेळा मतदारसंघ बदलला आहे, त्यांना मोठ्या मनाने उद्धव ठाकरेंनी पक्षात घेतले होते, आता त्यांनी बोलू नये, असा टोलाही राऊत यांनी केसरकरांना लगावला.

Loading