BREAKING: रात्रभर एअरपोर्ट सुरू अन् राजकीय खलबतं; फडणवीस गुपचूप इंदूरहून बडोद्याला रवाना

BREAKING: रात्रभर एअरपोर्ट सुरू अन् राजकीय खलबतं; फडणवीस गुपचूप इंदूरहून बडोद्याला रवाना

मुंबई (प्रतिनिधी): आघाडी सरकारमध्ये फूट पडल्यानंतर आता भाजपकडून सरकार बनवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा आहे.

यादरम्यान देवेंद्र फडणवीसदेखील सुरत वा गुवाहाटीला जाणार का याबाबत तर्क वितर्क काढले जात होते.

दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. 24 जूनच्या रात्री भाजपचे वरिष्ठ नेता आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुपचूप पद्धतीने मुंबईतून विशेष विमानाने इंदूरला आले. आणि येथून ते बडोद्यासाठी रवाना झाले.

पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीसांबद्दलची गुप्त माहिती समोर आली आहे.

परतीच्यावेळेसही ते आधी इंदूरला आले आणि येथून मुंबईल परतले. महाराष्ट्रातील एअरपोर्ट शिवसेनेच्या ताब्यात असल्या कारणाने फडणवीसांना आपली यात्रा गोपनीय ठेवली आणि इंदूरला येऊन गुजरातला गेले. त्यांच्या या प्रवासादरम्यान दोन्हीही वेळेस कोणी विमानातून उतरलं नाही आणि चढलंदेखील नाही. विमानात केवळ इंधन भरण्यात आलं.

मुंबईपासून बडोदा अवघ्या 400 किलोमीटरवर आहे. आणि मुंबईहून इंदूर 600 किलोमीरट. अशात मुंबईहून थेटबडोद्याला जाण्याऐवजी फडणवीस इंदूरच्या मार्गाने येथे का गेले? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून आपली गुजरात दौरा लपवण्यासाठी ते व्हाया इंदूरहून गेले.

काल 24 जून रोजी सायंकाळी त्यांच्या दौऱ्याची माहिती मिळाली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांना वाटलं की, फडणवीसांसोबत इंदूरहून कोणी जाईल किंवा परत येईल. मात्र दोन्ही वेळेस विमानात दुसरं कोणीच चढलं वा उतरलं नाही. अधिकाऱ्यांनाही कळालं नाही की, जर त्यांना बडोद्याला जायचं होतं, तर इंदूरला का आले. कारण मुंबई ते बडोदा हवाई मार्गाने सरळ आहे. तर इंदूर दुसऱ्या दिशेला आहे.

सध्या इंदूर विमानतळ रनवेच्या रुंदीकरणाच्या कामासाठी रात्री बंद ठेवलं जातं. मात्र फडणवीस इंदूरला येणार असल्याने काल इंदूर एअरपोर्ट रात्रभर सुरू ठेवण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीस विशेष विमानाने काल रात्री 10.45 वाजता मुंबईहून इंदूरला पोहोचले होते. येथे विमानात इंधन भरवण्यात आलं. यानंतर 11 वाजता विमान इंदूरहून बडोद्यासाठी रवाना झालं. आज सकाळी 4.40 वाजता ते याच विशेष विमानाने बडोद्याहून इंदूरला पोहोचले आणि विमानात इंधन भरवल्यानंतर 4.55 वाजता परत मुंबईसाठी रवाना झाले. त्यांना ये-जा करण्यासाठी रात्रभर विमानतळ सुरू होतं. अन्यथा दररोज एअरपोर्ट रात्री 11 ते सकाळी 6 वाजेदरम्यान बंद केला जातो.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News