कोरोना महामारी कधी संपणार? WHO च्या उत्तरानं वाढवली चिंता

कोरोना महामारी कधी संपणार? WHO च्या उत्तरानं वाढवली चिंता

भारतासह जगभरातील बहुतेक देशांमध्ये मागील दीड वर्षापासून कोरोनानं हाहाकार घातला आहे. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाली असली तरीही धोका टळलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेपासून (World Health Organization) आरोग्य कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच वेळोवेळी याबाबतची नवनवी माहिती उघड करत आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेनं नुकतीच दिलेली माहिती मात्र चिंता वाढवणारी आहे. WHO नं म्हटलं की कोरोनाला अजून महामारीच्या श्रेणीतच ठेवलं जाईल, कारण हा विषाणू लगेचच जाणार नाही. संघटनेच्या या विधानातून हे स्पष्ट होतं की जगाला अजूनही प्रसार रोखण्यासाठी निर्बंध पाळणं गरजेचं आहे. कारण कोरोनाचे नवे व्हेरिएंट काळजी वाढवत आहेत.

[wpna_related_articles title=”More Important News” ids=”1258,1254,1148″]

आरोग्य संघटनेनं म्हटलं, की जेव्हा जगभरातील अधिकाधिक लोकांना लस (Corona Vaccine) दिली जाईल तेव्हा लोकांची इन्युनिटी वाढेल आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण आपोआप कमी होईल. या स्थितीत पोहोचल्यानंतर कोरोनाला महामारीच्या श्रेणीतून हटवलं जाईल. सोबतच कोरोनाची लागण होणाऱ्या लोकांच्या संख्येतही घट होईल. मात्र, आरोग्य संघटनेनं हेदेखील स्पष्ट केलं, की सध्या अशी स्थिती आलेली नाही.

भारतात कोरोनापासून बचावासाठी अतिशय वेगानं लसीकरण मोहिम सुरू आहे. देशात 75 कोटीहून अधिकांनी लसीचा डोस दिला गेला आहे. सोबतच आता देशात लहान मुलांच्या लसीकरणाची तयारीही सुरू आहे. या महिन्याच्या शेवटीपर्यंत लहान मुलांची लसही उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

झायडस कॅडिलाच्या झायकोव्ह डी या लहान मुलांच्या लशीला देशात मान्यता देण्यात आली आहे. ते सप्टेंबरच्या अखेरीस मुलांचं लसीकरण सुरू करू शकतात. जर असं झालं, तर अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा यांच्यानंतर मुलांना लस देणारा भारत चौथा देश असेल.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News