WhatsApp वर काही सेकंदात डाउनलोड करा Covid-19 Vaccine Certificate, पाहा सोपी प्रोसेस

कोरोना व्हायरसचा नवा वेरिएंट ओमिक्रॉन भारतात, महाराष्ट्रात आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढू लागली आहे.

अनेक ठिकाणी जाण्यासाठी आता Covid-19 वॅक्सिन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.

सध्याच्या या काळात कोरोना वॅक्सिन घेणं महत्त्वाचं आहे.

वॅक्सिननंतर सर्टिफिकेट डाउनलोड करणं गरजेचं आहे. Co-Win साइटवरुन वॅक्सिन घेतल्याचं सर्टिफिकेट डाउनलोड करता येतं.

Covid-19 वॅक्सिन सर्टिफिकेट WhatsApp वरुनही डाउनलोड करता येऊ शकतं. यासाठी केवळ रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरुन WhatsApp वर मेसेज करावा लागेल. WhatsApp वर MyGov Corona Helpdesk चॅटबॉटवरुन युजर सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. हे चॅटबॉट मार्च 2020 मध्ये Covid-19 शी संबंधित प्रश्नांची उत्तर देण्यासाठी तयार करण्यात आलं होतं.

Covid-19 चे दोन्ही डोस घेऊन झाल्यानंतर कोरोना वॅक्सिन सर्टिफिकेट डाउनलोड करता येतं. यासाठी सर्वात आधी फोनमध्ये +91 9013151515 नंबर MyGov Corona Helpdesk नावाने सेव्ह करावं लागेल.

नंबर सेव्ह झाल्यानंतर WhatsApp ओपन करुन नव्या चॅट विंडोमध्ये जा आणि +91 9013151515 या नंबरवर Hi लिहून पाठवावं लागेल. इथे अनेक पर्याय दिसतील.

त्यात Download Certificate सिलेक्ट करावं लागेल. यासाठी 2 टाइप करुन पाठवावं लागेल. यानंतर OTP येईल. हा ओटीपी मेसेजमध्ये लिहून पाठवावा लागेल. ओटीपी कन्फर्म झाल्यानंतर मोबाइल नंबरवर रजिस्टर्ड लिस्ट येईल. इथे ज्या लोकांचं कोरोना वॅक्सिन सर्टिफिकेट डाउनलोड करायचं आहे ते सिलेक्ट करा. त्यानंतर मेसेजमध्ये कोरोना सर्टिफिकेट PDF फॉर्मेटमध्ये पाठवलं जाईल.

Loading