Weather Alert: राज्यात आणखी दोन दिवस पावसाळी स्थिती निर्माण होणार

Weather Alert: राज्यात आणखी दोन दिवस पावसाळी स्थिती निर्माण होणार

मुंबई (प्रतिनिधी): दिवाळीदरम्यान, अनेक किनारपट्टी भागांना पावसानं तडाखा दिला.

ज्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात आणखी दोन दिवस पावसाळी स्थिती निर्माण होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार बुधवारनंतर तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात आणखी दोन दिवस पावसाळी स्थिती राहण्याची शक्यता आहे.

अवघ्या काही दिवसांमध्ये पाऊस झाल्यानंतर दिवसा तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील गेल्या २४ तासांत कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. पुढील 48 तासांत कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता घटणार आहे. त्यानंतर दिवसाच्या तापमानात वाढ होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवमानात होणारे हे बदल पाहता आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहनही करण्यात येत आहे.

दरम्यान, फक्त महाराष्ट्र नव्हे, तर दक्षिणेतडील तामिळनाडू भागातही रविवारी जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं. इथं हवामान खात्यानं ‘रेड अलर्ट’ जारी केल्यामुळे प्रशासकीय यंत्रणा सतर्क असल्याचं दिसून येत आहे.