कुख्यात चंदन तस्कर वीरप्पन याची मुलगी विद्या राणी हिने शनिवारी तामिळनाडूच्या कृष्णागिरी येथे आयोजित कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला.
पक्षाचे सरचिटणीस मुरलीधर राव आणि माजी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन उपस्थित होते. "मला गरीब आणि वंचितांसाठी त्यांची जात आणि धर्म विचारात न घेता काम करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजना लोकांसाठी आहेत आणि मला ते लोकांपर्यंत पोहोचवायचे आहे," असे विद्या राणी म्हणाल्या. विद्या राणी यांच्या व्यतिरिक्त इतर राजकीय पक्षांचे सुमारे एक हजार सभासद भाजपमध्ये सहभागी झाले होते.