UPI Payments : इंटरनेटचा वापर न करता UPI पेमेंट करणं शक्य; पण कसं? जाणून घ्या

UPI Payments : आज अनेक ठिकाणी ऑनलाईन पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात होत असला तरी इंटरनेटची सुविधा नसेल तर हे काम थांबतं. पण आता इंटरनेटविनाही UPI पेमेंट करता येऊ शकतं.

मुंबई (प्रतिनिधी): डिजिटल पेमेंट आता आपल्या जीवनातील अविभाज्य घटक बनला आहे. विशेषकरून तरुणाई या डिजिटल पेमेंटचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहे.  UPI पेमेंट म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस (Unified Payments Interface) सुविधेमुळे आपल्या आयुष्यातील अनेक कामं सुरळीत झाल्याचं दिसून येतंय. पण  UPI पेमेंटचा वापर करायचा म्हणजे इंटरनेट हवं. अनेक ठिकाणी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसते आणि मग आपल्याला नाईलाजास्तव कॅश व्यवहार करावा लागतो. पण इंटरनेट नसलं तरी आता UPI पेमेंट करता येणं शक्य आहे.

[wpna_related_articles title=”More Interesting News” ids=”1247,1187,1148″]

इंटरनेट शिवाय कसं करायचं UPI पेमेंट?
सर्वप्रथम आपला मोबाईल क्रमांक आपल्या अकाऊंटला कनेक्ट असायला हवा. पेमेंट करण्यासाठी त्यावर *99#  डायल करा. त्या ठिकाणी आपल्याला अनेक पर्याय दिसतील. 1 हा क्रमांक प्रेस करुन सेंड करा. ज्या माध्यमातून आपल्याला पेमेंट करायचं आहे ते माध्यम निवडा. जर मोबाईल नंबर वर पैसे सेंड करायचे असतील तर 1 हा क्रमांक प्रेस करा. या ठिकाणीही संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक त्याच्या अकाऊंटला कनेक्ट असायला हवा. त्यानंतर रक्कम भरा आणि सेंड हे बटन प्रेस करा. ट्रान्झेशन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपला UPI PIN टाका. अशा पद्धतीने आपण इंटरनेट विना UPI पेमेंट पूर्ण करु शकता.

कार्डद्वारे ऑनलाईन पेमेंट पद्धतीत बदल:
भारतीय रिझर्व्ह बँकेने टोकनायझेशनसाठी नवीन नियम जारी केले आहेत. नवीन नियमांतर्गत डेबिट कार्डद्वारे पेमेंट करण्याच्या पद्धतींमध्ये बदल होणार आहेत. RBI कार्ड जारी करणाऱ्यांना पेमेंट अॅग्रीगेटर आणि व्यापाऱ्यांसह कार्ड टोकनाईझ करण्याची परवानगी देते. त्याचबरोबर नवीन नियमांमध्ये प्रायव्हसीकडेही लक्ष देण्यात आले आहे.

तुमच्या कार्डचा नंबर तुम्ही शेअर न करताही पेमेंट करता येणार आहे. टोकनायजेशनमध्ये तुम्हाला तुमचे कार्ड डिटेल टाकण्याची गरज नाही. त्याऐवजी टोकन नावाचा एक पर्यायी क्रमांक मिळणार आहे, जो तुमच्या कार्डाशी लिंक असेल. ज्याचा वापर करून तुमच्या कार्ड तपशील तुम्ही सुरक्षित ठेवू शकता आणि पेमेंट करू शकता.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News