“या” जिल्ह्यांच्या परिसरात येत्या काही तासात अवकाळी पावसाची शक्यता !

मुंबई: येत्या काही तासात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता असल्याचा हवामान खात्यानं म्हंटल आहे.

बीड, नांदेड, लातूर, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तसेच परिसरात जोरदार अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाउस होण्याची चिन्हं आहेत. पश्चिम महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे राब्बिचं पिक धोक्यात आलेलं असतानाच आता येत्या काही तासात जोरदार पाउस पडेल अशी एक शक्यता वर्तवली जातेय. काही ठिकाणी गारपीटही झालेली आहे. बीडमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसलेल्या होत्या. वाशीममध्ये सुद्धा तीच परिस्थिती होती तर पाथर्डी तालुक्यात तर गारपीट झाली आहे.

या शक्यतेमुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Loading