TrueCaller ला टक्कर देणार BharatCaller; काय आहे या अॅपची खास गोष्ट?
भारतातील कॉलर आयडी अॅप Truecaller शी स्पर्धा करण्यासाठी भारतकॉलर (BharatCaller) हे अॅप लॉन्च करण्यात आले आहे. डेव्हलपर कंपनीचा दावा आहे की हे अॅप केवळ Truecaller पेक्षा चांगले नाही तर एक उत्तम अनुभव देईल. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) बंगळुरूचे विद्यार्थी प्रज्वल सिन्हा यांनी भारतकॉलर अॅप तयार केले आहे. तर कुणाल पसरीचा हे या अॅपचे सहसंस्थापक आहेत. या दोघांना 2020 चा राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार देण्यात आला आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअर आणि अॅप स्टोअरवरून मोफत डाऊनलोड करता येते.
डेटा लीक होणार नाही:
मीडिया रिपोर्टनुसार, भारतकॉलरच्या सर्व्हरवर यूजर्सचे संपर्क आणि कॉल लॉग सेव्ह केले जात नाहीत. जेणेकरून त्यांची गोपनीयता कोणत्याही प्रकारे भंग होऊ नये. या व्यतिरिक्त, कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे यूजर्सच्या फोन नंबरचा डेटाबेस नाही आणि ते अशा डेटामध्ये प्रवेश करू शकत नाहीत. भारतकॉलर अॅपचा सर्व डेटा एनक्रिप्टेड स्वरूपात संग्रहित केला जातो. यामध्ये गोपनीयतेची अशा प्रकारे काळजी घेण्यात आली आहे की त्याचा डेटा भारताबाहेर कोणी वापरू शकत नाही. हे अॅप इंग्रजी तसेच हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती भाषांमध्ये उपलब्ध आहे.
कॉलर आयडी अॅप म्हणजे काय?:
कॉलर आयडी अॅप हे आजच्या युगात अतिशय उपयुक्त अॅप आहे. याच्या मदतीने कोण अज्ञात व्यक्ती तुम्हाला कॉल करत आहे हे शोधू शकता. याद्वारे तुम्ही फोन करणाऱ्याचे नाव जाणून घेऊ शकता. जरी तुमच्या फोनमध्ये नंबर सेव्ह केला नसला तरी तुम्ही त्याचा तपशील मिळवू शकता. याद्वारे तुम्ही कॉल रिसीव्ह करायचा की नाही हे ठरवू शकता. त्याची खासियत म्हणजे त्याच्या मदतीने फसवणुकीचे कॉल देखील तुम्ही ब्लॉक करू शकतात.