SBI ने बंद केली 60000 खाती, यामध्ये तुमचं अकाउंट तर नाही ना?

SBI ने बंद केली 60000 खाती, यामध्ये तुमचं अकाउंट तर नाही आहे ना?

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank of India) 60,000 पेक्षा जास्त चालू खाती (Current Accounts) बंद केली आहेत. बँकेने ईमेल आणि एसएमएसच्या माध्यमातून ग्राहकांना याबाबत माहिती दिली आहे. काही सरकारी आणि खासगी बँकांनी त्यांच्याकडील करंट अकाउंट्स बंद करण्यास सुरुवात केली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना बँकांनी लाखोंच्या संख्येत करंट अकाउंट बंद केली आहेत. आरबीआयच्या या निर्णयामुळे MSME आणि छोट्या व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागेल.

आरबीआयने दिले आहेत हे निर्देश:
RBI ने निर्देशात असं म्हटलं आहे की बँकेने त्या ग्राहकांचं करंट अकाउंट त्यांच्या बँकेत उघडू नये ज्यांनी दुसऱ्या बँकेतून कर्ज घेतले आहे. काही ग्राहकांनी एका बँकेकडून लोन घेऊन आणि मग दुसऱ्या बँकेत करंट अकाउंट उघडून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे आरबीआयने असे निर्देश दिले आहेत. अशाप्रकारच्या घटनांवर निर्बंध आणण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. आरबीआयच्या या नियमाचं पालन करण्याअंतर्गत एसबीआयने 60000 चालू खाती बंद केली आहेत.

करंट अकाउंट म्हणजे काय?:
चालू खातं अर्थात करंट अकाउंटमधून खातेधारकांना एका दिवसात अनेक ट्रान्झॅक्शन करण्याची मुभा असते. तुम्ही एका दिवसात अनेक वेळा एटीएममधून पैसे काढू शकता, बँकेतील व्यवहारही अनेक वेळा करु शकता. या व्यवहारांसाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागत नाही. हे एक बिझनेस अकाउंट असतं, ज्यामध्ये ओव्हरड्राफ्ट अर्थात खात्यात पैसे नसले तरी पैसे काढण्याची सुविधा मिळते. मात्र या खात्यातील रकमेवर बचत खात्याप्रमाणे व्याज मिळत नाही.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.