दहावी व बारावी परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर

मुंबई (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी व बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार, २९ एप्रिल ते २० मे २०२१ या काळात दहावी बोर्डाची परीक्षा घेतली जाण्याची शक्यता आहे. २३ एप्रिल ते २१ मे या दरम्यान बारावीची परीक्षा घेतली जाऊ शकते. हे संभाव्य वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले आहे.
कोरोना संसर्गामुळे या परीक्षा घेण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे सरकारच्या परवानगीनंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने या लेखी परीक्षांचे आयोजन केले आहे. याबाबत बोर्डाने काढलेल्या पत्रकानुसार, शाळा, कनिष्ठ महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन करता यावे तसेच विद्यार्थ्यांचा ताण कमी व्हावा यासाठी मंडळाने एप्रिल-मे २०२१ च्या लेखी परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले. www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. दरम्यान संभाव्य वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा/उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय यांच्याकडे छापील स्वरुपात दिले जाणारे वेळापत्रकच अंतिम असणार आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News