Sputnik V लस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; बूस्टर डोससंदर्भात महत्त्वाची माहिती समोर

Sputnik V लस घेतलेल्यांसाठी मोठी बातमी; बूस्टर डोससंदर्भात महत्त्वाची माहिती समोर

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

यामुळे सरकार लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न करत आहे.

विशेषत: राजधानी दिल्लीत कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.

यामुळे  लसीकरणावर राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाच्या समितीने (NTAGI) शिफारस केली आहे. NTAGI च्या स्थायी तांत्रिक उपसमितीची शुक्रवारी बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा लाखांहून अधिक लोकांना रशियन लस मिळाली आहे.

NTAGI ने काय शिफारस केली?:
ज्या लोकांनी रशियाच्या अँटी-कोविड लस स्पुटनिक-व्हीचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना या लसीचा पहिला डोस बूस्टर म्हणून दिला जाऊ शकतो. स्पुटनिक-व्ही लसीच्या दोन डोसच्या रचना भिन्न आहेत. रशियन लस घेतलेल्या लोकांसाठी बूस्टर डोस देण्याबाबत सध्या कोणताही धोरणात्मक निर्णय नाही. Co-Win पोर्टल Sputnik-Vसाठी कोणताही बूस्टर डोस पर्याय प्रदर्शित करत नाही. ज्या लोकांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये स्पुतनिक-व्ही लसीचा दुसरा डोस घेतला त्यांना बूस्टर डोस मिळू शकला नाही.

NTAGIच्या स्थायी तांत्रिक उपसमितीची शुक्रवारी बैठक झाली. यात या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आणि अशी शिफारस करण्यात आली की ज्या लोकांनी रशियन कोरोना लस स्पुटनिक-व्ही चे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना या लसीचा पहिला डोस बूस्टर म्हणून दिला जाऊ शकतो.

Corona च्या लक्षणांमध्ये आणखी एकाची भर:
देशातील वाढत्या कोरोना (Corona) रुग्णांमुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. अनेक बड्या आरोग्य तज्ज्ञांनी कोरोना मार्गदर्शक (Corona Guidelines) तत्त्वांचं काटेकोरपणे पालन करण्याचा आग्रह धरला आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)वाढत्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांचे म्हणणे आहे की, बहुतेक प्रकरणांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. तरीही लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. वृत्तसंस्था ANI नुसार, दिल्लीतील अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर निखिल मोदी यांनी सांगितलं की, गेल्या 10 दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली आहे.

डॉ. मोदी म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांमध्ये डायरियासारख्या पोटाशी संबंधित समस्या देखील पहिल्यांदाच दिसून येत आहेत. गेल्या 10 दिवसांत डायरियासारख्या आजाराशी संबंधित अनेक कोरोनाचे रुग्ण समोर आले आहेत. मात्र, त्यांच्या रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण खूपच कमी आहे. ज्या लोकांना आधीच आरोग्याशी संबंधित आजार आहेत त्यांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News