अलर्ट! आता नोटांमधूनही होऊ शकतो कोरोनाचा प्रसार, RBI ने दिली माहिती

9 मार्च रोजी सीएआयटीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून नोटा जीवाणू आणि विषाणूंचे वाहक आहेत का? असा सवाल केला होता.

नाशिक (प्रतिनिधी): कोरोनाचा प्रसार देशात वेगानं होत आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या वतीनं लोकांना विविध प्रकारे आवाहन केले जात आहे. यातच भारतीय रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीमुळे सर्वांची चिंता वाढली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (CAIT) यांनी रविवारी असे सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) नोटा या कोरोनाचे संभाव्य वाहक असू शकतात याची पुष्टी केली आहे.

डिजिटल पेमेंटस प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेने लोकांना प्रोत्साहन देण्याची मागणी केली आहे. याआधी 9 मार्च रोजी सीएआयटीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पत्र लिहून नोटा जीवाणू आणि विषाणूंचे वाहक आहेत का? असा सवाल केला होता.

मंत्रालयाकडून हे पत्र रिझर्व्ह बॅंकेला पाठविण्यात आल्याचे महासंघाने निवेदनात म्हटले आहे. त्यांनी नोटा हे कोरोना व्हायरससह बॅक्टेरिया आणि विषाणूंचे वाहक असू शकतात अशी सूचना सीएआयटीला दिली, हे टाळण्यासाठी डिजिटल पेमेंटचा अधिकाधिक वापर केला पाहिजे, असे आवाहन CAITने केले आहे.

या पत्रात RBIने सांगितले आहे की, “कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी, लोक मोबाइल आणि इंटरनेट बँकिंग, क्रेडिट आणि डेबिट कार्ड इत्यादी विविध ऑनलाइन डिजिटल चॅनेलद्वारे घरी बसून पैशांची देवाण घेवाण करू शकतात. यामुळे नोटांच्या संपर्कात येण्यापासून लोकं वाचू शकतात”.

CAITचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि महासचिन प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, आरबीआयनं लोकांनी जास्तीत जास्त डिजीटल पेमेंटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. लोकांमध्ये डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला यांना काहीतरी योजना सुरू करण्याचे आवाहन सीएआयटीने केले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, “डिजिटल पेमेंटसाठी आकारण्यात आलेला बँक शुल्क माफ करावे आणि सरकारने बँकांच्या शुल्काविरूद्ध बँकांना थेट अनुदान द्यावे. ही अनुदान सरकारवर आर्थिक भार टाकणार नाही, तर ते नोटांच्या छपाईवर असेल. यामुळे खर्च कमी करेल”. याआधीही नोटांमुळे कोरोना पसरत असल्याच्या अफवा होत्या, मात्र आता CAITने दिलेल्या माहितीनंतर सरकार कोणत्या उपाययोजना आणेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News