लवकरच येणार कोरोना कॅप्सूल? भारतात तयार होतेय कोरोनाचा खात्मा करणारी कॅप्सूल

NCAD

मुंबई : कोरोनावर औषध कधी येणार? या प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळणार आहे. कारण भारतात कोरोनावरची कॅप्सूल तयार होते आहे. प्रेमास बायोटेक नावाची कंपनी कोरोनावरची कॅप्सूल तयार करते आहे. अमेरिकन कंपनी ओरामेड फार्मा या कंपनीच्या मदतीनं भारतात ही कॅप्सूल तयार होते आहे. 

कंपनीच्या दाव्यानुसार कोरोनाशी लढायला एक कॅप्सूल पुरेशी आहे. एक कॅप्सूल घेतल्यावर शरीरात कोरोनाशी लढणा-या अँटीबॉडीज तयार होतील, असा दावा करण्यात आला आहे. या अँटीबॉडीज श्वसननलिका, पोट आणि आतड्यांचं कोरोनापासून संरक्षण करतील असं सुद्धा कंपनीने म्हटले आहे. 

भारतात तयार होणा-या कॅप्सूलचं नाव ओरावॅक्स कोविड१९ कॅप्सूल असणार आहे. सध्या या कॅप्सूलच्या ट्रायल्स सुरू आहेत. या ट्रायल्समध्ये कॅप्सूलने उत्तम परिणाम दिल्याचा कंपनीचा दावा आहे. सध्या लसीकरण सुरू आहे… पण तरीही रुग्णसंख्या वाढतेय. काहींना कोरोनाची लस घेतल्यानंतरही कोरोना झाल्याचं समोर आले आहे. त्यामुळे आता ही कॅप्सूल तरी परिणामकारक ठरते का हे पाहावं लागेल. 

प्रेमास बायोटेकचे (Premas Biotech) सह संस्थापक डॉ. प्रबुद्ध कुंडू यांनी सांगितले की, ”ओरावॅक्स कोरोनाची लस वीएलपी नियमांवर आधारित आहे. ही लस कोरोनापासून तीनपटींनी अधिक सुरक्षा देईल. कोरोना व्हायरसचे इंक प्रोटीन, मेम्ब्रेन एम आणि एनवेलप-ई टार्गेट्स या तिन्हींपासून बचाव करेल. या औषधामुळे कोरोनाच्या संक्रमणाने येत असलेल्या श्वसनाच्या अडथळ्यांपासून बचाव होऊ शकतो.” 

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.