creditcard

गर्भवती हत्तीणीच्या मृत्यूमागे धक्कादायक खुलासा, अननसात नव्हते भरले फटाके तर…

axis

तिरुवनंतपुरम (केरळ), 06 जून : केरळ (Keral) मध्ये गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खाऊ घातल्याने तिचा अंत झाल्याची घटना माणूसकीला काळीमा फासणारी आहे. पण या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अननसात नाही तर नारळामध्ये फटाके भरण्यात आल्याचं आरोपींनी म्हटलं आहे. ज्यामुळे हत्तीणीचा दुर्देवी मृत्यू झाला. मन्नारकाडचे वन्यजीव संरक्षण अधिकारी सुनील कुमार हे या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची चौकशी करत आहेत. त्यातून हा खुलासा झाल्याचं सांगण्यात येत आहे.

No posts found.

या संपूर्ण घटनेचा तापस करत असलेले वन विभागाचे अधिकारी आरोपी विल्सन (40) ला त्या ठिकाणी घेऊन गेले जिथे नारळामध्ये फटाके भरण्यात आले होते. आतापर्यंतच्या तपासानुसार, आणखी दोघांनी आरोपीची मदत केली होती. जे आता फरार असल्याचं सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा रबरच्या शेतीमध्ये काम करतो. तपासात समोर आलं की, हे लोक आपल्या शेताचं रक्षण करण्यासाठी फळांमध्ये फटाके भरून ठेवतात, त्याने जंगली जनावरांना घाबरवण्यास मदत होते.

आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हत्तीणीने हे फटाक्यांनी भरलेलं नारळ स्वत: खाल्लं की तिला ते खाण्यासाठी देण्यात आलं याचा शोध लागणं. पण नाराळलाती फटाके खाल्ल्यामुळे हित्तीणीच्या चेहऱ्याला प्रचंड जखमा झाल्या होत्या. ती जेवण तर सोडाच पण पाणीदेखील पिऊ शकत नव्हती. वेदनांनी ग्रासलेल्या या हत्तीणीला काहीच कळलं नाही, तेव्हा ती वेलीयार नदीत उभी राहिली. वेदना कमी करण्यासाठी संपूर्ण वेळ फक्त पाणीच पित होती. पण अखेर या वेदनांनी तिचा मृत्यू झाला.