
नवी दिल्ली (मधु सिन्हा): गेल्या 24 तासात जास्तीत जास्त नवीन प्रकरणं आणि सर्वाधिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या नव्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 9887 नवीन प्रकरणे समोर आली असून एकूण 294 मृत्यू झाले आहेत.
No posts found.
देशात आतापर्यंत कोरोनाची 115942 अॅक्टिव्ह प्रकरणं असून 114072 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंतचा मृतांचा आकडा 6642 च्या घरात गेला आहे. शनिवारी आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोरोनाव्हायरस संक्रमणाची 2,436 नवीन प्रकरणं समोर आली आहेत. तर आतापर्यंतचा कोरोना रुग्णांचा आकडा 80,229 वर पोहोचला आहे. याव्यतिरिक्त राज्यात 139 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंतचा मृतांचा आकडा 2,849 वर पोहोचली आहे.