क्रेडिट कार्डावर EMI कनव्हर्जन सुविधा घेताय ? ही बातमी नक्की वाचा..

नवी दिल्ली: क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणं ही आता सवयीची बाब झाली आहे. मात्र अनेक युजर अनेकदा संपूर्ण बिल वेळेवर भरू शकत नाहीत. अशा लोकांना दिलासा देण्यासाठी,  क्रेडिट कार्ड जारी करणारी बँक किंवा कंपनी पूर्ण बिल किंवा त्यातील काही रक्कम कमी व्याजदराने काही महिन्यांसाठी ईएमआयमध्ये (EMI) रूपांतरित करण्याची सुविधा देते. मात्र ही सुविधा घेण्यापूर्वी, सर्व पर्यायांचा विचार करणं आवश्यक आहे. कधीकधी ही सुविधा तोट्याची ठरते. याबाबतीत दक्षता बाळगताना चार प्रमुख बाबींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

1) ईएमआय कनव्हर्जन सुविधा घेताना योग्य पर्याय निवडणं आवश्यक:
यातही काही वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी आपल्याला सोयीचा पर्याय ग्राहक निवडू शकतात. संपूर्ण बिल किंवा त्यातील काही भाग ईएमआयद्वारे भरण्याचा पर्याय – यामुळं अवाजवी व्याज दर (Interest rate) आणि उशिरा बिल भरण्यामुळे लागणारा दंड यापासून वाचता येईल. थकित बिल तुम्ही छोट्या छोट्या हप्त्यांमध्ये भरू शकता.

निवडक व्यवहार ईएमआयमध्ये भरण्याची सुविधा- हा पर्याय युझरला एका विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार ईएमआयमध्ये रूपांतरित करण्यास परवानगी देतो. ज्यांना केवळ निवडक व्यवहार ईएमआयमध्ये रूपांतरित करायचे आहेत, त्यांच्यासाठी हा पर्याय फायदेशीर ठरू शकतो.

क्रेडिट कार्ड शिल्लक ईएमआयवर ट्रान्स्फर करा –  अनेक बँका क्रेडिट कार्ड शिलकीवर (Credit Card Balance) ईएमआय सुविधा देतात. याद्वारे थकित बिल दुसऱ्या बँकेच्या क्रेडिट कार्डवर ट्रान्सफर करता येते. त्यानंतर ते ईएमआयद्वारे भरण्याची सुविधा घेता येते.

2) ईएमआय कनव्हर्जनसाठी व्याज दर:
EMI कनव्हर्जनवर लागू व्याजदर 23 टक्के ते 49 टक्के या वार्षिक व्याजदरापेक्षा कमी असतो. हा व्याज दर क्रेडिट कार्ड, कार्डधारकाचे क्रेडिट प्रोफाइल, त्याचं पेमेंट रेकॉर्ड आणि व्यवहारांनुसार आकाराला जातो. प्रत्येकासाठी तो वेगळा असू शकतो. EMI कनव्हर्जनवर प्रक्रिया शुल्कदेखील आकारले जाऊ शकते.

3) ईएमआय भरण्यासाठी मुदत:
निवडक क्रेडिट कार्ड व्यवहार ईएमआयमध्ये बदलण्यासाठी किंवा ईएमआयमध्ये क्रेडिट कार्ड बॅलन्स ट्रान्सफर करण्याचा कालावधी सामान्यत: 3 ते 48 महिन्यांच्या दरम्यान असतो, तर संपूर्ण बिल ईएमआयच्या माध्यमातून भरण्यासाठी 3 ते 60 महिन्यांपर्यंतचा कालावधी मिळू शकतो. दीर्घ मुदतीसाठी अधिक व्याज भरावं लागतं. त्यामुळं कमी कालावधी निवडणे फायद्याचं ठरतं.

4) इतर स्वस्त क्रेडिट पर्यायदेखील तपासा:
क्रेडिट कार्डद्वारे मोठी खरेदी करुन तुम्हाला ते बिल ईएमआयमध्ये रूपांतरित करायचे असेल तर आधी विक्रेता नो कॉस्ट ईएमआय असल्यास व्याज माफ करतो, त्याचा लाभ घ्यावा. त्यामुळं कार्ड धारकाला ईएमआय सुविधा घेतल्यानंतरही जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत. मात्र, त्या व्याजावरील जीएसटी द्यावा लागेल.

कर्जाबाबत हे देखील वाचा:
मोठ्या खरेदीसाठी, क्रेडिट कार्ड शिलकीवर कर्ज घेण्याऐवजी वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घेण्याचाही विचार करावा. दोन्ही पर्यायांमधील व्याजदर, इतर सवलती यांची तुलना करून निर्णय घ्यावा. चांगले क्रेडिट प्रोफाइल असलेल्या कार्डधारकांसाठी, अनेक बँका तसंच वित्तीय कंपन्या स्वस्त दरानं वैयक्तिक कर्ज उपलब्ध करतात. त्याचा व्याज दर क्रेडिट कार्डवर ईएमआय सुविधा घेण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या व्याजदरापेक्षा कमी असतो.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News