creditcard

पहिल्याच दिवशी Ola Scooter ची विक्री बंद, आता ‘या’ दिवशी होणार विक्री सुरु

axis

पहिल्याच दिवशी Ola Scooter ची विक्री बंद, आता ‘या’ दिवशी होणार विक्री सुरु

No posts found.

मुंबई (प्रतिनिधी): ओलाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरची विक्री कालपासून (मंगळवार) सुरु केली होती. पण संध्याकाळी वेबसाईटवर प्रॉब्लेम आल्याने स्कूटरची विक्री बंद करावी लागली होती.

ओलाने आपल्या ग्राहकांसाठी Ola Scooter ची परचेस विंडो सुरु केली होती. यामध्ये केवळ 499 रुपयांमध्ये ओला Ola Scooter ची बुकिंग करता येणार होती. पण वेबसाईटवर काही तांत्रिक समस्या येत असल्याची ग्राहकांनी तक्रार केली. त्यानंतर ओलाने एका ट्वीटच्या माध्यमातून Ola Scooter ची विक्री बंद करतोय असं जाहीर केलं.

वेबसाईटवरच्या तांत्रिक समस्यामुळे ग्राहकांना त्रास होतोय त्याबद्दल खेद व्यक्त करत ओलाने आता 15 सप्टेंबरपासून पुन्हा विक्री सुरु करण्यात येणार असल्याचं जाहीर केलंय. ओला स्कूटर S-1 आणि S-1 Pro या दोन प्रकारांमध्ये असणार आहे. ओला स्कूटर घरी पूर्णपणे चार्ज करण्यासाठी 6 तास लागतील.

ओलाच्या चार्जिंग सेंटरमधील हाय चार्जिंग पॉईंटमधून 50 टक्के चार्जिंग फक्त 18 मिनिटांत होईल असा दावा कंपनीने केला आहे. ओला स्कूटर सिंगल चार्जवर 150 किमीपर्यंत धावेल. याची मॅक्सिमम स्पीड रेंज 115 किलोमीटर प्रति तास इतकी आहे. इलेक्ट्रिक स्कूटर एस -1 ची एक्स-शोरूम किंमत 99 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि एस -1 प्रो ची किंमत 1 लाख 29 हजार 999 रुपये असेल.