महत्वाची बातमी: संपूर्ण नाशिक शहरात या दिवशी पाणीपुरवठा नाही !

नाशिक (प्रतिनिधी): मनपाचे गंगापुर धरण रा.वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील अ)132 के.व्ही. सातपुर ब)132 के.व्ही. महिंद्रा या दोन एक्सप्रेस फिडरवरुन जॅकवेलसाठी 33 के.व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे व मुकणे धरण रॉवॉटर पंपींग स्टेशन येथे महावितरण कंपनीचे रेमंड सबस्टेशन गोंदे येथुन 33 के.व्ही वीजपुरवठा घेण्यात आलेला आहे.

सदरचे केंद्रांवरील महावितरणकडुन ओव्हरहेड लाईनची पावसाळापुर्व कामे करणे करीता दि. 22/05/2021 रोजी सकाळी 09.30 ते सायंकाळी 6.00 वाजेपावेतो वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. सबब सदर दोन्हीही ठिकाणाहून होणारा पुर्ण शहराचा पाणीपुरवठा दि. 22/05/2021 रोजी बंद ठेवून उपरोक्त नमुद कामे करता येणे शक्य होणार आहे.

तरी मनपाचे  मनपाचे गंगापुर धरण व मुकणे धरण रॉ.वॉटर पंपिंग स्टेशन येथून संपूर्ण शहरास होणारा दि. 22/05/2021 रोजीचा सकाळचा व सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही तसेच दि. 23/05/2021 रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे असे आवाहन नाशिक महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News