महाराष्ट्रासाठी चिंतेची बातमी, या भागात आढळला घातक Nipah व्हायरस!

मुंबई (प्रतिनिधी): राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची एकीकडे भीती व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे  साताऱ्यातील महाबळेश्वरच्या गुहेमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा विषाणू सापडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एनआयव्ही (NIV) अर्थात राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेने याबद्दल माहिती दिली आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेनं एक रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे. यामध्ये राज्यातील साताऱ्यात असलेल्या महाबळेश्वरच्या गुहांमध्ये राहणाऱ्या वटवाघुळांमध्ये निपाह हा घातक विषाणू आढळून आला आहे. जर हा निपाह विषाणू वटवाघुळ यांमधून माणसांमध्ये आला तर तो अत्यंत धोकादायक समजला जातो कारण त्याच्यावरती अजून पर्यंत कुठलाही उपाय नाही आणि हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो, असं प्रसिद्ध केलेल्या रिसर्च पेपरमध्ये सांगण्यात आल आहे.

दोन वर्षांपूर्वी केरळमध्ये निपाह हा नावाचा विषाणू आढळून आला होता. या विषाणूचा फैलाव झाल्यामुळे 10 लोकांचा मृत्यू झाला होता.

‘निपाह’ विषाणू म्हणजे काय?:
जनावरं आणि माणसावर वेगाने हल्ला करतो आणि गंभीर आजार निर्माण करण्याची क्षमता. पुण्यातील नॅशनल व्हायरॉलॉजी इन्स्टीट्यूटने केलेल्या संशोधनानुसार, 1998 मध्ये मलेशियामधील कंपुंग सुंगईमधील निपाह नावाच्या गावात विषाणू सापडला. सुरुवातीला लागण डुकरांना लागण झाली होती, नंतर स्थानिक शेतकऱ्यांमध्ये पसरला. बांग्लादेश आणि मलेशियात प्रमाण जास्त.

‘निपाह’ची लक्षणं कोणती ?:
संसर्ग झालेल्या माणसाच्या, प्राण्याच्या संपर्क आल्यामुळे थेट मेंदूवर हल्ला करतो. मेंदुत ताप, थकवा, बेशुद्धावस्था अशी लक्षणं, सुरुवातीला 7-10 दिवस ताप, थकवा, शुद्ध हरपणं, चक्कर येणं, उलट्या होणं, मळमळणं, अस्वस्थ वाटणं. तात्काळ उपचार न घेतल्यास पुढील 24-48 तासामध्ये संबंधित व्यक्ती कोमामध्ये जाण्याची शक्यता.