या बँकेच्या ग्राहकांसाठी अलर्ट! आता ATM मधून पैसे काढणं महागणार ! चेकबुकवर देखील शुल्क

या बँकेच्या ग्राहकांसाठी अलर्ट! आता ATM मधून पैसे काढणं महागणार ! चेकबुकवर देखील शुल्क आकारले जाणार आहे

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून किंवा बँक शाखेतून 1 जुलैपासून पैसे काढण्यासाठीचे नियम बदलत आहेत. चेकबुक जारी करण्याबाबतही नियमात बदल होत आहेत. नवीन नियमांनुसार, एटीएम किंवा शाखेतून पैसे काढण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये देखील वाढ केली जाणार आहे. हे वाढलेले शुल्क बेसिक सेव्हिंग अकाउंट डिपॉझिट (BSBD) अकाउंट खातेधारकांवर लागू होतील. एसबीआयकडून चेकबुकवर देखील शुल्क आकारले जाणार आहे.

फ्री लिमिटनंतर द्यावं लागणार इतकं शुल्क:
एसबीआय बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट अकाउंट गरीब घटकांना कोणत्याही शुल्काशिवाय खाती उघडण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आहे. त्याला झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाउंट असंही म्हणतात. या खातेदारांना एटीएम-कम-डेबिट कार्ड मिळतं. केवायसीची वैध कागदपत्रे असलेली कोणतीही व्यक्ती एसबीआयकडे बीबीएसडी खातं उघडू शकते. बीएसबीडी खातेधारकांना दरमहा चार वेळा मोफत पैसे काढता येतात, ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे. मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी घेईल. पैसे काढण्यावर शुल्क होम ब्रँच, एटीएम आणि गैर एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यावर लागू होईल.

नवीन चेकबुक जारी करण्यावर शुल्क:
SBI BSBD खातेधारकांना एका फायनान्शिअल इयरमध्ये 10 चेकची कॉपी मिळते. आता 10 चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. 10 चेकच्या पानांसाठी बँक 40 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारेल. 25 चेक लीवसाठी बँक 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करेल. इमर्जन्सी चेकबुकवर 10 पानांसाठी 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवर नवीन सेवा शुल्कातून सूट दिली जाईल.

एटीएममधून पैसे काढण्याचे नियम:
SBI ATM किंवा बँकेतून पैसे काढणं चार वेळा मोफत आहे. यानंतर पैसे काढण्यासाठी 15 रुपये आणि जीएसटी शुल्क लागू करण्यात येतं. एसबीआयने ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. एसबीआयने अलीकडेच धनादेश वापरुन रोख पैसे काढण्याची मर्यादा वाढवून दररोज एक लाख रुपये केली आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News