NIA Raid Nashik: मालेगावात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा कार्यकर्ता ताब्यात

नाशिक (प्रतिनिधी): राष्ट्रीय तपास संस्थेने पॉपुलर फंड ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू केली आहे. महाराष्ट्रातही पुणे, नवी मुंबई, भिवंडी, औरंगाबादसह इतर ठिकाणी छापेमारी सुरू आहे. अशातच मालेगाव शहरात देखील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या एका कार्यकर्त्यास ताब्यात घेण्यात आले आहे.

राष्ट्रीय तपास संस्थेने देशभरात ठिकठिकाणी पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर छापेमारी सुरू केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने रात्री तीन वाजता नवी मुंबईतील नेरूळमधील पीएफआय च्या कार्यालयावर छापा मारला. तर पुण्यातही कारवाई सुरू असून दोघांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर औरंगाबाद मधून देखील एटीएसने चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर संवेदनशील समजले जाणाऱ्या मालेगाव मधून देखील रहमान यास एटीएसने ताब्यात घेतले आहे.

दरम्यान मालेगावमध्ये ईडी आणि छापे टाकले असून यात एकाला अटक करण्यात आले आहे. पहाटे एनआयए च्या टीमने राज्यभरात अनेक ठिकाणी संघटना असलेल्या पॉप्युलर फंड ऑफ इंडियावर रात्री तीन वाजता छापेमारी सुरू केली. यात मालेगावच्या एकाचा देखील समावेश आहे. पॉप्युलर फंड ऑफ इंडिया या संघटनेकडून अनेक संशयास्पद घटनांचा धोका असल्याचा अलर्ट आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्यास सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे या पॉप्युलर फंड ऑफ इंडिया या वादग्रस्त संघटनेची देशभरात तीन लाख फॅमिली अकाउंट असून या खात्यांमध्ये फॅमिली मेंटेनन्सच्या नावाखाली कतार कुवेत बहरीन आणि सौदी अरेबियातून 500 कोटीहून अधिक रुपये आल्याची माहिती समोर आली आहे

दरम्यान या छापेमारी बाबत अत्यंत गोपनीयता बाळगण्यात आली असून त्यामुळे अद्याप अधिकृत माहिती पुढे आली नाही. दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून ही छापेमारी सुरू करण्यात आले आहे. पीएफ आईचे महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय कोंढवा भागात आहे. या ठिकाणी काही प्रशिक्षण केंद्र चालवले जात असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

मालेगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या हुडको कॉलनी परिसरातील घरातून सैफुर रहमानला आज पहाटे चारच्या सुमारास एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतलय, त्याच्या घरातून काही महत्वाची कागदपत्रेही हस्तगत करण्यात आल्याची माहिती आहे. सैफुरला ताब्यात घेतल्यानंतर नाशिक जिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन भद्रकाली परिसरातील एटीएस कार्यालयात त्याला आणण्यात आले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पथकाकडून कार्यालयात त्याची कसून चौकशी केली जात आहे. सैफुरवर मालेगावला यापूर्वी काही आंदोलनाचे गुन्हे दाखल आहेत. PFI चा नाशिक जिल्हाध्यक्ष तसेच राज्यसंघटनेचेही त्याच्याकडे पद असल्याची चर्चा आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News