नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांच्या आकड्यानं आज उच्चांक गाठला. गेल्या 24 तासांत रेकॉर्ड ब्रेक 24 हजार 879 नवीन रुग्णांची नोंद झाली.तर, 487 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 7 लाख 67 हजार 296 झाली आह. बुधवारी नवीन रुग्णांच्या आकड्यात घट झाल्यानंतर आज पुन्हा कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.
आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात आता 2 लाख 69 हजार 789 सक्रीय रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 21 हजार 129 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत 4 लाख 76 हजार 377 रुग्ण निरोगीही झाले आहे. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या माहितीनुसार बुधवारी देशात 1 कोटी 4 लाख 73 हजार 771 चाचण्या झाल्या आहेत. यातील सर्वात जास्त 2 लाख 62 हजार 679 रुग्णांची चाचणी 7 जुलै रोजी करण्यात आली.
वर्ल्डोमीटरनं दिलेल्या आकडेवारीनुसार, जगात एक कोटी 21 लाख 55 हजारहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 5 लाख 51 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 70 लाखांहून अधिक लोकं निरोगी झाले आहेत. जगभरात 45 लाख 79 हजार सक्रिय रुग्ण आहेत.