नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ५६ हजार ८५२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १६ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १ हजार ४८५ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार २८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक १ हजार ६८८, बागलाण ६९४, चांदवड ६८५, देवळा ६०५, दिंडोरी ७५९, इगतपुरी १७६, कळवण ५६२, मालेगाव ४७१, नांदगाव ४५५, निफाड १ हजार २४५, पेठ ६९, सिन्नर १ हजार २१४, सुरगाणा २५१, त्र्यंबकेश्वर १३०, येवला २५६ असे एकूण ९ हजार २६० पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ५ हजार ८९१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ७० तर जिल्ह्याबाहेरील एकही रुग्ण नसून असे एकूण १६ हजार २२१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ७७ हजार ३५३ रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी:
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९१.९२ टक्के, नाशिक शहरात ९६.४९ टक्के, मालेगाव मध्ये ८८.८२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.५७ इतके आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले मृत्यू:
नाशिक ग्रामीण २ हजार ६७ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ८२२ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून २९२ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार २८० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)