नाशिक शहरातील या दोन कोविड हॉस्पिटल्सची मान्यता रद्द…

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
नाशिक शहरातील दोन प्रख्यात हॉस्पिटल्सने बिलं तपासण्यासाठी उपलब्ध न करून दिल्यामुळे त्यांची कोविडची मान्यता रद्द करून साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश ऑडीटरला देण्यात आले आहेत..!

नाशिक शहरातील ९ हॉस्पिटल्समध्ये कोरोनामुळे मृत्यूचा दर जास्त होता. त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. याबाबत त्यांनी खुलासा करणे अपेक्षित होते. त्याचप्रमाणे रुग्णांना आकारलेली बिलं तपासण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने ऑडीटर नेमले आहेत. परंतु रामालयम आणि मेडीसिटी हॉस्पिटल हे मनपाच्या ऑडीटरला बिलं तपासण्यासाठी उपलब्ध करून देत नव्हते. ८० टक्के आणि २० टक्के बेडचा हिशोब ते नाशिक महानगरपालिकेच्या ऑडीटरला देत नव्हते. त्यांना वारंवार नोटीस दिली होती.

त्यानंतर त्यांना संधी देऊनसुद्धा त्यांनी बिलं उपलब्ध करून दिले नाहीत. त्यामुळे त्यांची कोविडची मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्यांच्यावर साथरोग प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश ऑडीटरला देण्यात आले आहे. या हॉस्पिटल्सला कोविडचे रुग्ण दाखल करून घेता येणार नाही, अशी माहिती नाशिक महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले आहे.

Loading