पुणे : कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासा टाळाटाळ करणाऱ्या पुण्यातील खासगी डॉक्टरांवर आता मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाई केली जाणार आहे. यासंदर्भातील अधिकार प्रशासनाला मिळाले आहेत. सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी कामवर असणे गरजेचे आहे. यापार्श्वभूमीवर प्रशासनाने हे आदेश आहेत.
कोरोना रुग्णावर उपचार करण्यास नकार, वैद्यकीय सेवेसाठी हजर नसलेल्या डॉक्टर आणि परिचारिकांविरोधात कारवाई केली जाणार आहे. नुकतेच परिचारिकांविरोधातही मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचे आदेश काढले होते. इतिहासात पहिल्यांदा खाजगी डॉक्टर आणि परिचारिकांनाही मेस्मा लागू करण्यात आला आहे.
नुकतेच राज्यात कोरोना लढ्यासाठी परिचारिका कमी पडू लागल्याने महाराष्ट्राच्यावतीने केरळकडे डॉक्टर आणि परिचारिकांची मागणी करण्यात आली होती. पण सरकारच्या या मागणीला परिचारिकांच्या संघटनेकडून विरोध करण्यात आला.
मेस्मा म्हणजे काय?
महाराष्ट्र अत्यवाश्यक सेवा परिक्षण अधिनियम 2011 म्हणजे मेस्मा. रुग्णालये आणि दवाखाने यांच्यासह सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता राखण्याच्या संबंधातील सेवा अत्यावश्यक आहेत. किरकोळ व घाऊक औषधविक्री सेवा ही अत्यावश्यक सेवा आहे. उपरोक्त कायद्यानुसार लोकहित ध्यानात घेऊन संपास मनाई करण्यात येते. आदेश झुगारणाऱ्यांवर कारवाई करण्यात येते. प्रामुख्याने रुग्णालये आणि दवाखाने यांच्यासह आरोग्य आणि स्वच्छता राखण्याच्या संबंधातील सेवा अत्यावश्यक आहेत.