18 ते 44 लसीकरण तुर्तास स्लो डाऊन, वृद्धांना पहिले प्राधान्य: राजेश टोपेंची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी): राज्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लसीकरणावर भर दिला जात आहे. पण लशीचा साठा उपलब्ध नसल्यामुळे अनेक लसीकरण केंद्र बंद पडली आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी लशी या 45 वर्षांपुढील व्यक्तींना दिली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी मुंबई पत्रकार परिषद घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल केलेल्या उपाययोजनेची माहिती दिली. राज्यात अॅक्टिव्ह केस कमी होत आहे. बरे होण्याच्या दर वाढत आहे. 2 लाख टेस्टिंग राज्यात केले जात आहे. व्हॅक्सिसीन 1 कोटी 84 लाख झाले आहे. आता 35 हजार कोव्हॅक्सिन उपलब्ध आहे. राज्य शासनाने खरेदी केलेली 3 लाख कोव्हॅक्सिन 45 वर्षांवरील व्यक्तींना दिले जाणार आहे, त्यांना दुसरा डोस देणे गरजेचं आहे. त्यामुळे हे डोस 45 पुढील वयोगटांना दिले जाणार आहे, असं टोपे यांनी स्पष्ट केलं.

वय 18 ते 44 या वयोगटातील लस देण्याचे जाहीर केले होते. पण लशीचा साठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. ज्यांना दुसरा लशीचा डोस दिला नाही तर पहिला डोस हा वाया जाऊ शकतो. म्हणून  18 ते 44 या वयोगटातील लशीचा साठा हा 45 वरील वयोगट यासाठी वळवण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवर चर्चा केली आहे. त्यामुळे 18 वर्षांवरील लसीकरणाचा वेग काही दिवस स्लो डाउन करावे लागेल, टास्क फोर्स समवेत चर्चा करून कॅबिनेट चर्चा करून निर्णय करू, असंही टोपे यांनी स्पष्ट केले.

म्युकोरमायकोसिस बाबत काही जिल्ह्यात हे रूग्ण आढळत आहेत. सरकारी रूग्णालयात महात्मा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार मोफत केले जाणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या औषधाचा खर्च राज्य सरकार उचलणार आहे, असंही टोपेंनी जाहीर केलं. रेमडेसीवीरचे ग्लोबल टेंडर काढले जाणार आहे. ६ कंपन्या यासाठी इच्छुकता दाखवली आहे. साधरण प्रत्येक कंपनी किमान ५० हजार रेमडेसीवीर उपलब्ध करून देईल, असंही टोपेंनी सांगितले. व्हॅक्सिनबाबत ग्लोबल टेंडर काढणे कठीण आहे. कारण त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी गरजेची आहे. केंद्र सरकरला विनंती केली आहे की व्हॅक्सिनसाठी परवानगी द्यावी लागेल, असंही टोपेंनी सांगितले.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.