मुंबई (प्रतिनिधी): महाविकास आघाडीने उद्या (दि. २४ ऑगस्ट) शनिवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले आहे, या संदर्भात शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी बंदमध्ये आपले पक्ष आणि आपला धर्म विसरुन आपल्या मुलींच्या भविष्यासाठी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
“राजकीय कारणासाठी उद्याचा बंद नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी हा बंद आहे. आम्ही विकृतीचे विरोधक आहोत. कोणत्याही राजकीय पक्षांचा नाही तर सर्व नागरिकांच्यावतीने उद्याचा बंद आम्ही करत आहे. सर्व भेद विसरून उद्या बंदमध्ये सहभागी व्हा”, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेंनी केले आहे.
“सरकारला काहीही म्हणून देत मी जनतेच्या बाजूने आहे. जनतेला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. यंत्रणा वेळेत हलली असती तर हा उद्रेक झाला नसता. आता हायकोर्टाने काल थोबडवलं तेही राजकारणाने प्रेरित होतं का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
दुपारी दोनपर्यंत कडकडीत बंद पाळा: उद्धव ठाकरे
उद्याच्या बंद हा महाराष्ट्राच्या जनेतसाठी आहे. हा बंद विकृती विरोधी संस्कृती आहे. बऱ्याच पालकांना आपले मुलं शाळेत सुरक्षित आहे का? याची भीती वाटत आहे. याला वाचा फोडण्यासाठी उद्याचा बंद आहे. उद्याचा बंद महाविकास आघाडीतर्फेच नाही तर सर्व जनतेचा बंद आहे. सर्वांना या बंदात सहभागी व्हा, तसेच उद्याचा बंद कडकडीत असावा बंद काळात ज्या अत्यावश्यक सेवा आहे त्या चालू राहतील. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत हा बंद पाळावा. दुकानदारांनाही उद्या बंद पाळावा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.
आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे: उद्धव ठाकरे
बदलापूर प्रकरणातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजेत. नाहीतर आम्हाला उद्या रस्त्यावर उतरावं लागेल. आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही, पण सुरक्षित बहीण महत्त्वाची आहे. आता संतापचा कडेलोट होत आहे. आजही अटक सुरू आहे दरोडेखोरांना आणतात तसे आणले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.