देशातील विविध शहरांमध्ये कोरोन चे संशयित रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यापैकी अनेकांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांना घरी सोडून देण्यात येत आहे. मात्र कर्नाटक मध्ये एका कोरोना बाधीताचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर देशातील वैद्यकीय यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. वैद्यकीय यंत्रणांसोबतच नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे. तरच कोरोना व्हायरस हा नियंत्रणात येऊ शकेल. बघुयात कर्नाटकमधून काय माहिती समोर आली आहे.
कर्नाटकातील कलबुर्गी येथे पहिल्या करोना आजाराच्या संशयित असलेल्या ७६ वर्षीय रूग्णाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. खुद्द कर्नाटक सरकारनेच ही माहिती जाहीर केली आहे. या रूग्णाला करोना व्हायरसची लागण झाल्याच्या माहितीवर सरकारनेच शिक्कामोर्तब केले आहे. भारतात करोनामुळे मृ्त्यू झाल्याची ही पहिलीच घटना समोर आली आहे. आतापर्यंत भारतातल करोनाचे ६० रूग्ण आढळले आहेत. तर महाराष्ट्रात ५ संशयित रूग्ण आढळले आहेत.