मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई (प्रतिनिधी): वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या निलंबनानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख तसेच, मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांच्याही राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी अनेक जण येत आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली आहे.

सचिन वाझे यांच्या अटकेनंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. मुंबईचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत. याआधी पोलीस उपायुक्त मिलिंद भारंबे यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यानंतर विश्वास नांगरे पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.

गुन्हे शाखेचे सहआयुक्त मिलिंद भारंबे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली, जवळपास ४५ मिनिटे बैठक झाली. सचिन वाझे प्रकरणावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीवेळी एकनाथ शिंदे आणि अनिल परब हे देखील ‘वर्षा’वर उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान वर्षावर बैठकांचे सत्र सुरुच आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News