creditcard

Gold Rate Today : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; तपासा 10 ग्रॅम गोल्डचा भाव

axis

Gold Rate Today : सलग तिसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण; तपासा 10 ग्रॅम गोल्डचा भाव

No posts found.

नवी दिल्ली: सोन्याच्या दरात मागील तीन दिवसांपासून घट होत आहे.

अशात जर तुम्ही आज सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर आज सोन्यात 0.07 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या किमतीत 0.42 टक्क्यांची घसरण झाली आहे.

केडिया कमोडीटीचे डायरेक्टर अजय केडिया यांनी सांगितलं की देश आणि जगभरात महागाई वाढत आहे. यासोबतच यूक्रेन आणि रशिया यांच्यातील वाढत्या विवादामुळे ग्लोबल टेन्शनही वाढलं आहे. यामुळे सोन्याला आधार मिळेल आणि यंदा सोन्याच्या किमती 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतात.

एप्रिल डिलिव्हरीच्या सोन्याचा दर आज 0.07 टक्क्यांनी घसरून 49,582 रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. तर आज चांदीच्या दरात 0.42 टक्के घट झाली असून दर 63,031 रुपये प्रति किलोग्रॅम इतका आहे. तुम्ही सोन्याचे दर घरी बसूनही तपासू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या नंबरवर मिस्डकॉल द्यावा लागेल आणि तुमच्या फोनवर मेसेज येईल. यात तुम्हाला लेटेस्ट रेट चेक करता येतील.

तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे.