BREAKING NEWS: सोन्यामध्ये 6000 रुपयांची घसरण, आज देखील कमी होणार दर

मुंबई (प्रतिनिधी): कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी डॉलरमध्ये आता सुरक्षित गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अमेरिकी डॉलकमध्ये तेजी आहे. ज्याचा परिणाम सोन्याचांदीच्या किंमतीवर पाहायला मिळत आहे. मंगळवार नंतर बुधवारी देखील सोन्याचे दर उतरले आहेत. एमसीएक्स एक्सचेंजवर बुधवारी ऑक्टोबरच्या डिलीव्हरीच्या सोन्याचे दर 0.4 टक्क्यांनी घसरून 50,180 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीची वायदा किंमत 1.6 टक्क्यांनी कमी होत दर 60,250 रुपये प्रति किलोग्राम झाले आहेत. त्यामुळे या आठवड्यात मौल्यवान धातूंच्या किंमतीत सातत्याने घसरण सुरू आहे. आधीच्या सत्रात सोन्याचेदर 100 रुपयांनी उतरले होते तर सोमवारी सोन्याचे दर 1200 रुपयांनी कमी झाले होते.

6000 रुपयांनी स्वस्त झाले सोने
गेल्या महिन्यात सोन्याचे दर सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. या रेकॉर्ड स्तरावर पोहोचल्यानंतर आतापर्यंत जवळपास 6000 रुपयांनी सोने उतरले आहे. 7 ऑगस्ट रोजी एमसीएक्सवर सोन्याचे दर 56,000 रुपये प्रति तोळापेक्षाही अधिक होते. तर सराफा बाजारात सोन्याचे भाव 56,200 प्रति तोळावर पोहोचले होते. आता सोन्याचे दर 51 हजार प्रति तोळाच्या आसपास आहेत.

विदेशी बाजारात स्वस्त झाले सोने
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर कमी झाले आहेत. विदेशी बाजारात सोन्याची स्पॉट किंमत कमी होऊन 1900 डॉलर प्रति औंस झाली आहे.

का कमी होत आहेत सोन्याचे दर ?
सध्या अमेरिकन डॉलरमध्ये तेजी आली आहे. डॉलर निर्देशांक इतरांपेक्षा आठव्या आठवड्यातील सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री घटल्यामुळे त्याचा परिणाम देशांतर्गत बाजारात झाला आहे. तसंच कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी डॉलरमध्ये आता सुरक्षित गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अमेरिकी डॉलरमध्ये तेजी आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News