अतितातडीच्या नसणाऱ्या सेवा काही दिवस बंद करा !

मुंबई: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ट्वीट करत पंकजा मुंडे म्हणतात, ‘कोरोनामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन कमी होणार असून शनिवारी अधिवेशनाचा समारोप होणार असल्याचे समजते. तसेच शाळा, महाविद्यालयात आणि अतितातडीच्या नसणाऱ्या सेवाही ही काही दिवस बंद कराव्या,’ असं त्या म्हणाल्या.

राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या अकरावर पोहोचली आहे. करोनाची लागण झालेले मुंबईत दोन आणि पुण्यात आठ रुग्ण सापडले असतानाच, नागपुरातही एक करोनाबाधित रुग्ण सापडला आहे. दरम्यान, नागपूरकरांनी आता गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहे.आता नागपुरातही करोनाचा रुग्ण आढळल्याने नागपुरकरांनी आता अधिक सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले.