चीन: कोरोनाच्या संशयाने आईने दहा दिवसाच्या मुलीला सार्वजनिक शौचालयाच्या थंड फरशीवर सोडले

कोरोनाव्हायरसची भीती इतकी आहे की लोक काहीही सोडत आहेत. अगदी पोटच लेकरूसुद्धा. असाच एक प्रकार चीनमध्ये घडला आहे. एका दहा वर्षाच्या मुलीला तिच्या जन्मदात्या आईने कोरोनाच्या संशयावरून सार्वजनिक शौचालयाच्या फरशीवर सोडून दिले. काहींच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी प्रशासनाला कळविले.

झाओ नावाचा एक माणूस चीनच्या सिचुआन प्रांतातील मियांयांग शहरात सार्वजनिक शौचालय वापरण्यासाठी गेला होता. त्याला एका क्यूबिकलच्या आतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आणि तो सतर्क झाला. त्याने ताबडतोब हि बाब पोलिसांना आणि प्रशासनाला सांगितली. त्याने लगेच त्याचा व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्या बाळाकडे गेला.. झाओने पाहिले की एका शौचालयाच्या क्यूबिकलमध्ये, सुमारे 10 दिवसांची एक मुलगी कपड्याविना विव्हळत होती.

त्याने या बाळाला एका कपड्यामध्ये गुंडाळल आणि स्वास्थ्य विभागाच्या लोकांकडे सुपूर्द केलं. पोलिसांचा संशय आहे, कि या बाळाच्या आईला कोरोना झाला असावा आणि म्हणूनच तिने आपल्या बाळाला अशा अवस्थेत सोडून दिल.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News