मुंबई ; राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून आज त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगितलं आहे. या वृताने त्यांचा समर्थकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
धनजंय मुंडे यांना श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना 12 जून रोजी तातडीने ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मुंडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. गेल्या 11 दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर उपचार सुरु होते.मात्र आता त्यांची प्रकृती ठीक असल्याने आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येत आहे.
धनंजय मुंडे यांना पुढील 14 दिवस घरातच क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यानंतर ते लगेचच कामात रुजू होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, बीड जिल्हा राष्ट्रवादीनं एक ट्वीट केलं आहे. त्यात म्हटलं आहे की, धनंजय मुंडे यांच्याशी व्हिडीओ चाट केलं. ते आता पूर्णपणे बरे झाले आहेत. लवकरच आपलं काम सुरू करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.