Corona Vaccine घेतल्यानंतर तुम्ही अशी चूक करू नका; मोदी सरकारकडून इशारा

नवी दिल्ली: कोरोना काळात डिजीटल व्यवहारात मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मात्र कोरोना काळातच सायबर फ्रॉड प्रकरणांतही मोठी वाढ झाली आहे. सध्याच्या या परिस्थितीत कधी, कशाप्रकारे Cyber Crime मध्ये फसवणूक होईल याचा अंदाज लावता येत नाही. त्यामुळे सर्वांनी कायम सतर्क राहणं महत्त्वाचं आहे. वेळोवेळी सरकारही जनतेला सतर्क करण्यासाठी अ‍ॅडव्हायजरी जारी करत असतं. नुकतंच सरकारने Covid-19 वॅक्सिन सर्टिफिकेटबाबत इशारा दिला आहे.

सोशल मिडिया साईटवर करू नका पोस्ट:
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना लस घेतल्यानंतर, त्यासंबंधीत वॅक्सिन सर्टिफिकेट ऑनलाईन पोस्ट करू नका. या सर्टिफिकेटमध्ये व्यक्तीचे पर्सनल डिटेल्स असतात. या डिटेल्सचा वापर करुन फ्रॉडस्टर्स फसवणूक करू शकतात.

कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सरकारकडून वॅक्सिनेशन सर्टिफिकेट दिलं जातं. यात तुमच्या वॅक्सिन डोसशिवाय इतर माहितीही असते. या वॅक्सिनेशन सर्टिफिकेटचा भविष्यात आंतरराष्ट्रीय प्रवासासारख्या अनेक कामांसाठी वापर होऊ शकतो. हे कोविन वेबसाईट किंवा आरोग्य सेतू App वरुन डाउनलोड केलं जाऊ शकतं. हे ट्विट अधिकृत ट्विटर हँडल Cyber Dost ने ट्विट केलं आहे. Cyber Dost ट्विटर हँडल, भारत सरकारचं गृह मंत्रालय मॅनेज करतं.

कोणत्याही प्रकारची माहिती देऊ नका:
केवळ वॅक्सिन सर्टिफिकेटच नाही, तर कोणत्याही प्रकारची माहिती Social Media वर शेअर करू नका. अशा प्रकारे एखादी माहिती शेअर करणं, धोकादायक ठरू शकतं.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.