कोरोनाने देशात रेकॉर्ड तोडला; २४ तासात ६०८८ नव्या रुग्णांची नोंद !

नवी दिल्ली, 22 मे : गेल्या 24 तासांत म्हणजेच गुरुवारी सकाळी 8 ते शुक्रवार सकाळी 7 दरम्यान देशभरात कोरोना व्हायरसच्या सुमारे 6100 घटना समोर आल्या आहेत. शुक्रवारी मिळालेल्या आकडेवारीनुसार, देशभरात एकूण 1,18,447 रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 66,330 सक्रिय प्रकरणं, 48,533 डिस्चार्ज, 3,583 मृत्यू आणि एक रुग्ण बरा होण्यापूर्वीच परदेशात गेला असल्याचं सांगण्यात येत आहे. आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 6,088 नवीन प्रकरणे नोंदली गेली.

आतापर्यंत अंदमान आणि निकोबारमध्ये 33, आंध्र प्रदेशात 2647, अरुणाचल प्रदेशात 1, आसाम 203, बिहार 1982, चंडीगड 217, छत्तीसगड 128, दादर-नगर हवेली 1, दिल्ली 11659, गोवा 52, गुजरात 12905, हरियाणा 1031, जम्मू- काश्मीर 1449, झारखंड 290, कर्नाटक 1605, केरळ 690, लडाख 44, मध्य प्रदेश 5981, महाराष्ट्र 41642, मणिपूर 25, मेघालय 14, मिझोरम 1, ओडिशा 1103, पुडुचेरी 20, पंजाब 2028, राजस्थान 6227, तामिळनाडू 13967, उत्तराखंड 146, उत्तर प्रदेश 5515 आणि पश्चिम बंगालमध्ये 3197, त्रिपुरा 173, तेलंगणामध्ये 1699 आणि हिमाचल प्रदेशमध्ये 152 प्रकरणे आहेत.

तर देशामध्ये बरं होणाऱ्या रुग्णांमध्ये देशभरातील अंदमान आणि निकोबारमधील 33, आंध्र प्रदेशातील 1709, अरुणाचल प्रदेशातील 1, आसाम 54, बिहार 593, चंदीगड 139, छत्तीसगड 59, दिल्ली 5567, गोवा 7, गुजरात 5488, हरियाणा 681, जम्मू कशमीर 684, झारखंड 129, कर्नाटक 571, केरळ 510, लडाख 43, मध्य प्रदेश 2843, महाराष्ट्र 11726, मणिपूर 2, मेघालय 12, मिझोरम 1, ओडिशा 393, पुडुचेरी 10, पंजाब 1819, राजस्थान 3485, तमिळनाडू 6282, उत्तराखंड 54, उत्तर प्रदेश 3204, पश्चिम बंगाल 1193, तेलंगणा 1035, त्रिपुरा 1148 आणि हिमाचल प्रदेश 59 प्रकरणे नोंदली गेली आहेत.

दरम्यान, देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संख्येमध्ये आंध्र प्रदेश 53, आसाम 4, बिहार 11, चंदीगड 3, दिल्ली 194, गुजरात 773, हरियाणा 15, जम्मू-काश्मीर 20, झारखंड 3, कर्नाटक 41, केरळ 4, मध्य प्रदेश 270, महाराष्ट्रात 1454, मेघालय 1, ओडिशा 7, पंजाब 39, राजस्थान 151, तामिळनाडू 94, उत्तराखंड 1, उत्तर प्रदेश 138, पश्चिम बंगाल 259, तेलंगणा 45 आणि हिमाचल प्रदेश 3 अशी मृतांची संख्या आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News