creditcard

BREAKING NEWS: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

axis

BREAKING NEWS: परिवहन मंत्री अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीचा छापा

No posts found.

मुंबई (प्रतिनिधी): राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे.

आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल परब यांच्या शासकीय आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानी छापा मारला आहे.

अनिल देशमुख यांनी केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे.

त्याशिवाय, ईडीने अनिल परब यांच्याविरोधात मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला असल्याचे वृत्त आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिल परब यांच्यावर ईडीने छापा टाकल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे.

आज सकाळी ईडीने अनिल परब यांचे शासकीय निवास्थान ‘अजिंक्यतारा’ आणि वांद्रेतील खासगी निवासस्थानासह त्यांच्याशी संबंधित सात ठिकाणांवर छापा मारला आहे. आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ईडीने छापा मारला.

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अनिल देशमुख यांना ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली होती. पोलीस बदली प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. त्याशिवाय, अनिल परब यांच्या दापोली येथील रिसॉर्ट प्रकरणात ही कारवाई झाली असल्याचे म्हटले जात आहे. ईडीने दापोली रिसॉर्ट प्रकरणात गुन्हा दाखल केल्याचे वृत्त आहे.

ईडीच्या छाप्यांमागे सचिन वाझे कनेक्शन?:
पोलीस बदल्यांप्रकरणी आरोपी सचिन वाझेंच्या जबाबामध्ये अनिल परबा यांचे नाव समोर आले होते. वाझेच्या जबाबानंतर ईडीकडून तपास सुरू झाला. त्याच अनुषंगाने ईडीने आज छापा मारला.

अनिल परबांचे साई रिसॉर्ट प्रकरण आहे काय?:
पर्यावरण मंत्रालय भारत सरकार यांनी 31 जानेवारी 2022 रोजी दापोली रत्नागिरी येथील साई रिसॉर्ट एन एक्स व सी कोच हे अनधिकृत असून तोडण्याचे आदेश दिले होते. 90  दिवसांमध्ये रिसॉर्ट मालक किंवा प्रशासनाने हे दोन्ही रिसॉर्ट तोडायचे होते. मात्र, 90 दिवस पूर्ण झाले असून अजूनही रिसॉर्ट पाडण्यात आले नाही.

अनिल परबांनी बॅग भरावी: किरीट सोमय्या
अनिल परब यांनी आता आपली बॅग भरावी अशी उपरोधिक प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली. अनिल परब यांच्यावर आता ईडीकडून अटकेची कारवाई होण्याचे संकेत सोमय्या यांनी दिले.