BREAKING : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीकडून अटक

मुंबई (प्रतिनिधी): मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने अटक केल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय पांडे यांना फोन टॅपिंग प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

संजय पांडे हे शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठीदेखील हा धक्का आहे.

दरम्यान, NSE कर्मचाऱ्यांच्या फोन टॅप प्रकरणी संजय पांडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. संजय पांडे यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केला होता, असा त्यांच्यावर आरोप होता.

NSE घोटाळा प्रकरणी चित्रा रामकृष्ण, रवी नारायण आणि आनंद्र सुब्रमण्यम यांना आरोपी बनवण्यात आलं होतं. तपासादरम्यान संजय पांडे यांच्या आयसेक नावाच्या कंपनीने 91 कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचं उघड झालं होतं. या फोन टॅपिंगसाठी संजय पांडे यांच्या कंपनीने चित्रा रामकृष्ण आणि इतर मॅनेजमेंटने 4 कोटी 45 लाख रुपये संजय पांडे यांना दिले होते. याशिवाय 20 कोटींचे संशयास्पद व्यवहार आयसेक कंपनीतून झाल्याचं उघड झालं होतं.