रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना का अटक झाली.. जाणून घ्या !

अन्वय नाईक आत्मह त्या प्रकरणी रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मुंबई (प्रतिनिधी): अन्वय नाईक आत्मह त्या प्रकरणी रिपब्लिक टीव्ही वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली आहे. आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.

इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांनी अलिबागजवळील कावीर इथं आपल्या घरी आत्महत्या केली होती. अन्वय नाईक यांनी आत्मह त्या केल्यानंतर त्यांच्या आई कुमुद नाईक यांचाही घरात मृतदेह आढळून आला होता.  या प्रकरणी गोस्वामी यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आज सकाळी मुंबई पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.  मिळालेल्या माहितीनुसार, अर्णब गोस्वामी यांना चौकशीसाठी अलिबागला नेण्यात येणार आहे.

दरम्यान, एएनआय वृत्तसंस्थेनं एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये गोस्वामी यांनी मुंबई पोलिसांनी आपल्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. याबद्दलचे रिपब्लिक वृत्तवाहिनीचे काही फोटो शेअर केले आहे.

काय आहे प्रकरण?

अन्वय नाईक यांची मुंबईत ‘कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड’ या नावाची कंपनी होती. मे 2018  अन्वय नाईक यांनी अलिबाग जवळील आपल्या राहत्या घरी आत्मह त्या केली होती. त्यांच्या खिश्यात एक सुसा ईट नोट आढळून आली होती. त्यात अर्णब गोस्वामी, आयकास्ट स्लॉशस्काय मीडियाचे फिरोज शेख, स्मार्ट वर्क्सचे नितेश सारडा यांनी आपले  पैसे थकविल्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं नमूद केले होते. त्यामुळे तिघांविरोधात आत्मह त्येत प्रवृत्त केल्या प्रकरणी अलिबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News