creditcard

अनन्या पांडे रात्री उशिरा या अभिनेत्यासह बाईकवर रोमांस करताना दिसली

axis

अनन्या पांडे अलीकडेच रात्री उशिरा साऊथ स्टार विजय देवेराकोंडासोबत बाईक राईड एन्जॉय करताना दिसले. अन्नायाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अन्नायाने ब्लॅक शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे आणि ती विजयबरोबर बाईकवर बसली आहे. अनन्या आणि विजय फाइटर या चित्रपटात एकत्र काम करत आहेत. पुरी जगन्नाथ दिग्दर्शित हा चित्रपट हिंदी व तेलगूमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहर करत आहेत.

No posts found.

स्टूडंट ऑफ दी इयर २ नंतर अनन्या पांडेचा हा चौथा चित्रपट असेल. स्टूडंट ऑफ द ईयर 2 या चित्रपटा नंतर अनन्या “पति-पत्नी और वो ” या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात कार्तिक आर्यन आणि भूमी पेडेनकर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनन्या लवकरच ‘खाली-पीली’ या चित्रपटात ईशान खट्टरच्या विरुद्ध दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन मकबूल खान करत आहेत.


फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानीत:

अलीकडेच अनन्याला फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार जिंकल्यानंतर ती म्हणाली, ‘हा पुरस्कार जिंकणे माझ्यासाठी किती मोठे आहे हे सांगू शकत नाही. माझ्या आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी आहे. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मी आरशासमोर पाण्याच्या बाटलीला माईक बनवून याचा अभ्यास करत आहे, आणि जेव्हा मला ते मिळाले तेव्हा तेव्हा मी खूप खुश झाले. मी माझे आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

पुरस्कार जिंकल्यानंतर जे भाषण देतात त्याचा मी रात्रभर सराव केला., परंतु माझे नाव जाहीर झाल्यावर मी गडबडले आणि मी मंचावर गेलो. मी सर्वकाही विसरले होते.. माझी आई माझ्यासोबत उपस्थित होती. माझ्या वडिलांना काही कारणास्तव समारंभात उपस्थित राहणे अशक्य होते, म्हणून मी घरी पोहोचताच प्रथम ट्रॉफी त्यांच्या हातात दिली. माझ्या यशाचा सर्वांनाच अभिमान वाटेल. ‘