Alert: HDFC बॅंकेबाबत अतिशय महत्वाची बातमी

आजच्या काळात आर्थिक नियोजनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

विशेषतः सेवानिवृत्तीनंतर आपल्याकडे पुरेशी पुंजी असावी, या दृष्टिकोनातून बहुतांश लोक गुंतवणूक किंवा बचतीला प्राधान्य देतात.

फिक्स डिपॉझिट अर्थात एफडी (FD) हा बचतीचा सुरक्षित आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो.

तुम्ही जर एफडी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

कारण देशातल्या खासगी क्षेत्रातल्या सर्वांत मोठ्या एचडीएफसी बॅंकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडींवरील व्याजदरांत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. `टीव्ही 9 हिंदी`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

एचडीएफसी बॅंकेने हा निर्णय बुधवारी (18 मे 22) जाहीर केला. हे नवे दर 18 मे 2022 पासून लागू झाले आहेत. बॅंक 7 ते 29 दिवासांच्या फिक्स्ड डिपॉझिटवर 2.50 टक्के व्याज देणार आहे. 30 ते 90 दिवसांमध्ये मॅच्युअर  होणाऱ्या एफडीवरील 3 टक्के व्याजदर कायम असेल.

सर्वसामान्य लोकांना 91 दिवसांपासून ते 6 महिन्यांपर्यंत मॅच्युअर होणाऱ्या एफडींवर 3.50 टक्के व्याजदर मिळेल. 6 महिने 1 दिवसापासून ते 9 महिन्यांच्या कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 4.40 टक्के व्याज मिळेल. एचडीएफसी बॅंक 9 महिने 1 दिवस आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 4.40 टक्के व्याज देत आहे. मात्र आता या कालावधीतील व्याजदर 4.50 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यात 10 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्यात आली आहे.

सामान्य नागरिकांसाठी 1 ते 2 वर्षांत मॅच्युअर होणाऱ्या डिपॉझिटवर एचडीएफसी बॅंकेने 5.10 टक्के हा व्याजदर कायम ठेवला आहे. यापूर्वी 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षादरम्यान मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर 5.20 टक्के व्याजदर दिला जात होता. पण आता त्यात 20 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली असून, हा दर आता 5.40 टक्के असेल. 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षापर्यंत मॅच्युअर होणाऱ्या ठेवींवर बॅंक 5.60 टक्के व्याज देणार आहे. या पूर्वी हा दर 5.45 टक्के होता. या दरात 15 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली आहे. 5 वर्षं 1 दिवस ते 10 वर्षादरम्यान मॅच्युअर होणाऱ्या एफडीसाठी यापूर्वी 5.60 टक्के व्याजदर होता. परंतु, आता त्यात 15 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली असल्याने हे व्याज आता 5.75 टक्के असेल.

एचडीएफसी बॅंकेचे एफडी वरील 2022 साठीचे व्याजदर याप्रमाणे असतील. 7 ते 14 दिवसांसाठी 2.50 टक्के,15 ते 29 दिवसांसाठी 2.50 टक्के, 30 ते 45 दिवसांसाठी 3.00 टक्के, 46 ते 60 दिवसांसाठी 3.00 टक्के, 61 ते 90 दिवसांसाठी 3.00 टक्के, 91 दिवस ते 6 महिन्यांच्या एफडीसाठी 3.50 टक्के, 6 महिने 1 दिवस ते 9 महिन्यांसाठी 4.40 टक्के, 9 महिने 1 दिवस ते 1 वर्षापर्यंत 4.50 टक्के, 1 वर्षासाठी 5.10 टक्के, 1 वर्ष 1 दिवस ते 2 वर्षादरम्यान 5.10 टक्के, 2 वर्ष 1 दिवस ते 3 वर्षांपर्यंत 5.40 टक्के, 3 वर्ष 1 दिवस ते 5 वर्षापर्यंत 5.60 टक्के तर 5 वर्ष 1 दिवस ते 10 वर्षापर्यंत 5.75 टक्के असा व्याजदर मिळेल.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News