रेमडेसिवीरबाबत होणार मोठा निर्णय.. सगळ्यांचं लक्ष लागून..

मुंबई (प्रतिनिधी): कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सर्वाधिक चर्चेत आलेलं औ’षध म्हणजे रेमडेसिवीर. कोरोना रुग्णांसाठी उपयोगाचं ठरणारं हे औ’षध, त्याची वाढती मागणी आणि तुटवडा, त्यानंतर या औषधाचा काळा बा’जार अशा अनेक बातम्या कित्येक दिवस कानांवर पडत आहेत. पण आता याच औष’धाबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

कोरोना रुग्णांसाठी ज्या रेमडेसिवीरचा वापर केला गेला ते औ’षध कोरोना रुग्णांच्या उपचारातून वगळण्याचा निर्णय लवकरच होणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्णयानंतर आता केंद्र आणि राज्य सरकारही याबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं, WHO ने कोरोना उपचारासाठी रेमडेसिवीर वगळण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान देशातील टास्क फोर्स आणि राज्यातील टास्क फोर्सशी याबाबत चर्चा केल्यानंतर राज्यातही कोरोना रुग्णांवर या औष’धाचा वापर बंद करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. रेमडेसिवीर वगळण्यात आल्यास कोरोना उपचार पद्धती बदलण्याची शक्यता आहे. कोरोना रुग्णांवरील उपचाराच्या प्रोटोकॉलमध्ये या औष’धाचा समावेश आहे.

रेमडेसिवीर या अँटि’व्हायरल उपयोग पहिल्यांदा ‘हिपॅटा’यटिस सी’वर उपचारांसाठी करण्यात आला होता. पण 2014 साली आफ्रिकी देशांमध्ये एबोला विषाणूने थै’मान घातलं, तेव्हा उपचारांसाठी त्याचा प्रभावी उपयोग झाल्यावर हे औष’ध चर्चेत आलं. मर्स, सार्स यांसारख्या एन्फ्लुएंझा संस’र्गांमध्येही त्याचा चांगला उपयोग झाला. कोरोना विषाणूची शरीरात वाढ होण्याला रेमडेसिवीर पायबंद घालतं, असं तज्ज्ञ म्हणतात.

कोणताही वि’षाणू जेव्हा मानवी शरीरात प्रवेश करतो, तेव्हा तो स्वतःला कणखर बनवण्यासाठी आपल्या प्रती तयार करतो. ही सगळी क्रिया मानवी शरीराच्या पेशींमध्ये घडत असतं. या प्रक्रियेसाठी विषाणूला एका एंझाइमची गरज असते. रेमडेसिवीर हे औ’षध या एंझाइमवर हल्ला करतं आणि वि’षाणूच्या मार्गात अडथळा निर्माण करतं.

कोरोना रुग्णांच्या उपचारातही या औ’षधाचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. त्याची वाढती मागणी, तुटवडा आणि काळाबाजार लक्षात घेत सरकारने या औ’षधाचं उत्पादनही वाढवलं होतं आणि त्याच्या किमतीवर नियंत्रण आणलं होतं.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.