महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णांचा उच्चांक ! राज्यात 24 तासांत 3254 नवे रुग्ण

मुंबई 10 जून: महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची सख्या वाढत चालली असून राज्यात आज तब्बल 3254 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर मुंबईत आत्तापर्यंतचे सर्वात जास्त मृत्यू झालेत. मुंबईत आज तब्बल 97 जणांचा कोरोनामुळे प्राण गेला. तर राज्यात आज  149 जणांचा मृत्यू झाला. राज्यात एकूण रुग्णांची संख्या 94041 वर गेली आहे. तर 1879 जणांचा डिस्चार्ज मिळालाय. राज्यात अॅक्टिव्ह केसेस 46074 आहे. मुंबईत आजची वाढ 1567 एवढी झाली आहे. तर  मुंबईतील रुग्णांचा एकूण आकडा  52667 वर गेला आहे. राज्यात कोरोनामुळे एकूण 3438 जणांचा मृत्यू झाला आहे.

जवळपास अडीच महिन्यांनंतर मुंबई आणि राज्यातले व्यवहार पुन्हा सुरळीत करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त गर्दी मुंबईत होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली आहे. लोक अनावश्यक घराबाहेर पडत राहिले, गर्दी करत राहिले तर लॉकडाऊनमध्ये दिलेली सुट परत घ्यावी लागले. म्हणजेच पुन्हा लॉकडाऊन लावावा लागेल असे संकेत मुख्यमंत्र्यांनी आज दिलेत.

8 जून पासून जवळपास सर्वच व्यवहारांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे गेली दोन दिवस मुंबईत पुन्हा एकदा ट्राफिक जाम अनुभवायला मिळालं. वाहनांची प्रचंड गर्दी झाली. लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडले. सोशल डिस्टन्सिंगचं पालनही होत नसल्याने सरकारची चिंता वाढली आहे

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.