चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! ‘या’ शहरातील नागरिकांना प्रवास करण्यास बंदी

चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर! ‘या’ शहरातील नागरिकांना प्रवास करण्यास बंदी

गेल्या दोन वर्षांपासून जगाला वेठीस धरलेल्या कोरोना व्हायरसनं चीनमध्ये पुन्हा एकदा कहर केला आहे.. चीनमधील फुजियान राज्यातील पुतियान शहरात कोरोनाचा कहर वाढला आहे. हा ताजा कहर डेल्टा वेरिएंटमुळे असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील नागरिकांना प्रवास करण्यास बंदी घातली आहे.

चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशननं दिलेल्या माहितीनुसार फुजियान राज्यात 20 नवे कोरोना पेशंट्स आढळले आहेत. यापैकी पुतियान शहरात 19 तर क्वांझाऊमध्ये 1 पेशंट आढळला आहे. चीनमध्ये आत्तापर्यंत 95, 199 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये 4, 636 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सिंगापूरहून मागच्या महिन्यात परतलेल्या चीनी नागरिकामुळे डेल्टा व्हेरिएंटचा प्रसार झाल्याचं मानलं जात आहे. किमान सहा जणांना यामुळे कोरोनाची लागण झाल्याची माहिती आहे. या नागरिकाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना आता आयोसलेशनमध्ये पाठवण्या आलं आहे. शुक्रवारी दोन कुटुंबातील सहा जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये 10 ते 12 वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे.

[wpna_related_articles title=”More Interesting News” ids=”1254,1247,1145″]

जगभरात किती केसेस?
जगभरात रविवारी कोरोनाच्या नव्या 3.73 लाख नवे पेशंट्स आढळले आहेत. 4.03 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 5, 913 जणांचा मृत्यू झालाय. रविवारी सर्वात जास्त 35, 450 पेशंट्स अमेरिकेत आढळली. त्यानंतर 31, 374 केसेससह भारताचा दुसरा क्रमांक आहे. तर कोरोनामुळे सर्वात जास्त 788 जणांचा मृत्यू रशियामध्ये झाला आहे.

आत्तापर्यंत जगभरात  22.54 कोटी नागरिक कोरोनामुळे संक्रमित झाले आहेत. यापैकी 20.20 कोटी जणांनी कोरोनावर मात केलीय. तर 46. 43 लाख जणांचा यात मृत्यू झाला आहे. सध्या 1.87 कोटी जणांवर उपचार सुरू असून यापैकी 1.03 लाख नागरिकांची परिस्थिती गंभीर आहे.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News