देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
नवी दिल्ली: देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच अनेक राजकीय नेत्यांसह बॉलिवूडमधील कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यातच मोठी बातमी समोर आली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी ट्विट केल्यानुसार – त्यांना कोरोनाची प्राथमिक लक्षण दिसून येत होती. त्यांनी चाचणी केल्यानंतर चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांनी पुढे लिहिले आहे की – त्यांची तब्येत ठीक आहे. मात्र डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना रुग्णालयात भरती करण्यात येत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करुन घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दरम्यान उत्तर प्रदेशचे भाजप अध्यक्षही स्वतंत्र देव हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये आपण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले आहे.
त्यातच आता अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. यानंतर अमित शहा यांच्या संपर्कात आलेल्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. याबाबत स्वत: अमित शहा यांनी ट्विट करुन विनंती केली आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वत:ला आयसोलेट करावे आणि चाचणी करुन घ्यावी असं आवाहन केलं आहे.