सावधान !! 5Gचं आमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रीय, सायबर गुन्हेगारीचा नवीन प्रकार

देशभरातील मुंबई, दिल्लीसारख्या प्रमुख शहरामध्ये 5G सेवा सुरु झाली आहे.  प्रत्येकजण या नव्या सेवेचा लाभ घेण्यास उत्सुक आहे. पण 5G सेवा घेत असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.

कारण, 5G चं अमिष दाखवून गंडा घालणारी टोळी सक्रीय झाली आहे.  प्रत्येकजण आपल्या मोबाईलमध्ये ती प्रणाली अपडेट करण्यासाठी आतुर असणार. हेच ओळखून काही सायबर हॅकर्सनी फसवणुकीचा एक नवा प्रकार देखील आणला आहे. सायबर क्राईममधील या नवीन प्रकाराला बळी पडू नका, असे तज्ज्ञाकडून सांगण्यात येत आहे.

तुमच्या मोबाइलवर मेसेज येईल अथवा कॉल देखील येऊ शकतो की तुमच्या मोबाईलमधील फोर जी प्रणाली अपग्रेड करून फाईव्ह जी करून घ्या. त्यासाठी सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून पुढील प्रोसेस पूर्ण करा. अथवा सोबत दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल करून माहिती जाणून घ्या. तुम्हाला यात संशय फारसा येत नाही आणि तुम्ही त्याप्रमाणे ते प्रोसेस सुरु करता आणि नंतर लक्षात येते की आपण फसलो आहे.

जर त्यांनी दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केलं तर त्या लिंकमधूनच तुमच्या मोबाईलमध्ये हॅकिंग व्हायरस घुसवला जातो आणि तुमचा फोनच हॅक होतो. आणि मग तुमच्या मोबाईलमधील सर्व डेटा (फोटो / चॅटिंग / बँकिंग डिटेल्स) चोरला जातो आणि त्यानुसार मग आर्थिक अथवा भावनिक ब्लॅकमेल करून पैसे लुटले जातात.  किंवा त्या टोल फ्री नंबरवर तुम्ही कॉल केला तर त्यांच्या प्रोसेसमध्ये आता तुम्हाला एक ओटीपी येईल तो आम्हाला सांगा असं म्हटलं जातं. तुम्ही तो त्यांना दिला की दुसऱ्या मिनिटाला लक्षात येईल की तुमच्या बँक खात्यातून परस्पर पैसे पळवले गेले आहेत. कारण तुमचा फोन सुद्धा तुमच्या बँक अकाउंटला लिंक केलेला असतो. तेव्हा कृपया अशा कोणत्याही कॉल ला / मेसेज ला अजिबात एन्टरटेन करू नका!

सावधगिरीचा उपाय :
या धोक्यापासून वाचण्यासाठी सोप्पा उपाय आहे. तुमचा नंबर (सिम कार्ड) ज्या कंपनीचा आहे. त्या सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीच्या  तुमच्या जवळच्या शोरूममध्ये स्वतः तुम्ही जा. आणि त्यांच्याकडून तुमचे सिम अपग्रेड करून घ्या. ते सर्वात सेफ आहे. कुणीतरी म्हटलं म्हणून स्वतःच ऑनलाईन पद्धतीने अपग्रेड करणे धोक्याचे आहे.  सायबर पोलिसांनी नागरिकांना आहवान केलं आहे की तुम्ही तर सावध राहाच पण हाच निरोप तुमच्या कुटुंबियांना / मित्रांना देखील जरूर सांगा.

Loading

Leave your vote

Log In

Forgot password?

Forgot password?

Enter your account data and we will send you a link to reset your password.

Your password reset link appears to be invalid or expired.

Log in

Privacy Policy

Add to Collection

No Collections

Here you'll find all collections you've created before.