शिवरायांच्या अपमानावर गप्प बसणारे राज्यपालांइतकेच दोषी; उदयनराजेंकडून आंदोलनाची घोषणा

मुंबई (प्रतिनिधी): छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपालांइतकेच त्यांच्या वक्तव्यावर शांत बसणारे दोषी असल्याचा हल्लाबोल उदयनराजे यांनी केला.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाची घोषणा त्यांनी केली. या आंदोलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वात आज किल्ले रायगड येथे  निर्धार शिवसन्मानाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी उपस्थितांना संबोधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले.

प्रत्येक जाती, धर्माचा सन्मान करण्याची शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच, शिवरायांचा अपमान सुरू असल्याचे उदयनराजे यांनी म्हटले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. राज्यपालांच्या वक्तव्यावर राज्यातील नेते शांत का बसलेत असा सवालही त्यांनी केला.

×
Get Upto 5 Lac Credit Limit
×
Breaking News